Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

SRA इमारतीत दुकान का चालवतो म्हणत, अपंगासह त्याच्या बहिणींना केली मारहाण

कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचोरे येथील न्यू गोविंदवाडी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतीत दुकान का चालवितो.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 22, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
कल्याणमध्ये वेश्या व्यवसायात तरूणींना आणून पैसे कमावणारी महिला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचोरे येथील न्यू गोविंदवाडी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतीत दुकान का चालवितो. असे प्रश्न करून दोन जणांनी एका अपंगासह त्याच्या दोन बहिणींना याच इमारतीमधील दोन जणांनी बेदम मारहाण केली. याठिकाणाहून निघून गेला नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा आरोपींनी दिला आहे. निजाम मदार शेख (४१) असे अपंगाचे नाव आहे. ते कचोरे येथील न्यू गोविंदवाडी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या घरात राहतात. ते येथे कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी एक दुकान चालवितात. सिकंदर नूर मोहम्द बगाड (३४), इक्बाल नूर मोहम्मद बगाड (३८) अशी आरोपींची नावे आहेत. ते याच वस्तीत राहतात. पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात तक्रारदार निजाम शेख कचोरे येथील न्यू गोविंदवाडी वसाहतीमधील आपल्या दुकानात बसले होते. संध्याकाळच्या वेळेत आरोपी सिकंदर बगाड, इक्बाल बगाड तेथे आले. त्यांनी मोठ्या ओरडा करत शिवागीळ करत निजाम हे अपंग आहेत.

हे माहिती असूनही त्यांना त्यांच्या दुकानातून बाहेर ओढले. त्यांना बेदम मारहाण केली. अपंग असल्याने निजाम स्वताचा बचाव करू शकले नाहीत. ते बचावासाठी ओरडत असताना निजाम यांच्या दोन बहिणी तेथे येऊन आपल्या अपंग भावाला मारहाणीपासून वाचविण्याचा प्रयत्न करू लागल्या. यावेळी आरोपींनी या दोन्ही बहिणींना शिवीगाळ करत मारहाण केली. तू येथले दुकान बंद कर नाहीतर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील, असा इशारा देत आरोपी तेथून निघून गेली. या मारहाणीमुळे निजाम रुग्णालयात दाखल झाले. उपचार घेतल्यानंतर ते टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले. पोलिसांनी अपंग संरक्षण कायद्याने गु्न्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक जे. बी. शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

३२ वर्षीय विवाहित महिलेवर दोन भावांचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

Next Post

ठाणे पोलीस आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी; डोंबिवलीतील बेकायदा राधाईच्या जमीन मालकांच्या जिवाला गुंडांपासून धोका

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

ठाणे पोलीस आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी; डोंबिवलीतील बेकायदा राधाईच्या जमीन मालकांच्या जिवाला गुंडांपासून धोका

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.