Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर; २४ मालमत्तांवर टाच, कर थकबाकीदारांना दणका

या आठवड्यात २४ विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 18, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरोधात पालिकेने आता कठोर कारवाई सुरू केली आहे. या आठवड्यात २४ विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये चार जेसीबी, एक पोकलेनसह विविध साहित्य पालिकेने ताब्यात घेतले. तर, वरळी येथील शुभदा गृहनिर्माण संस्थेला ३५.९४ कोटी रुपयांचा करभरणा करण्यासाठी ४८ तासांच्या मुदतीची नोटीस बजावली आहे.

मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी केल्या आहेत. मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले. या आठवड्यात पालिकेच्या ई, डी, जी दक्षिण, पी उत्तर, एच पूर्व, एम पश्चिम, एम पूर्व, एफ उत्तर या विभागांतील करधारकांच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी पाच दिवसांत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याची अंतिम तारीख २५ मे आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

१) एच पूर्व – जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेडचे कास्टिंग यार्ड – ८० कोटी रुपये

२) वरळी – शुभदा गृहनिर्माण संस्था – ३५.९४ कोटी, कर भरण्यासाठी ४८ तासांची मुदत

३) रेनिसन्स ट्रस्ट ६.७२ कोटी – चार जेसीबी आणि एक पोकलॅन जप्त.

४) जी दक्षिण – न्यू शरीन टॉकीज- ६ कोटी ४७ लाख – लिलावाची नोटीस जारी

४) मालाड – शांतिसागर रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे भूखंड – १.६५ कोटी रुपये

५) लोक हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे भूखंड – ३.९१ कोटी

६) चेंबूर – जी. ए. बिल्डर्सचे भूखंड – १.०५ कोटी रुपये

७) फ्लोरा अव्हेन्यू – व्यावसायिक गाळे – ९२.४२ लाख रुपये

८) अरिहंत रिॲल्टर्सचे भूखंड – १.९६ कोटी रुपये

९) ई विभाग – मेसर्स प्रभातचा व्यावसायिक गाळा – ७२ लाख.

१०) हेक्स रिॲल्टर्सचा व्यावसायिक गाळा – १.१२ कोटी रुपये

११) मालवणी – डॉटम रिॲल्टीचे भूखंड – १३.०६ कोटी रुपये

१२) मालाड – क्रिसेंट आदित्य रिॲल्टर्स प्रा. लि.चा भूखंड – २.५० कोटी

१३) एच पूर्व – एन. जे. फिनस्टॉक प्रा. लि.चा व्यावसायिक गाळा – ४५.८३ लाख रुपये

१४) पी उत्तर – समर्थ डेव्हलपर्सचा भूखंड – २.३१ कोटी

१५) अजंता कर्मवीर ग्रुपचा भूखंड – २.०५ कोटी रुपये

१६) डी विभाग – श्रीनीजू इंडस्ट्रीजचे व्यावसायिक गाळे – ३.७७ कोटी

१७) एम पश्चिम – नेत्रावती गृहनिर्माण संस्थेचे भूखंड – ६७.५१ लाख

१८) विजया गृहनिर्माण संस्थेचे भूखंड – १.६८ कोटी रुपये

१९) जयश्री डी. कावळे – १.६५ कोटी

२०) ई विभाग – सय्यद अकबर हुसैन यांचा व्यावसायिक गाळा – ५८.१३ लाख रुपये

२१) एफ उत्तर – बी. पी. टेक्नो प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांचे व्यावसायिक गाळे – ४१.०५ लाख

२२) ओसवाल हाइटस्चे व्यावसायिक गाळे – २६.४८ लाख रुपये

Previous Post

भावेश भिंडेला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी; होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

Next Post

भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Next Post
भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

BreakingNews

पगार हवाय? मग आधी ई-केवायसी करा! जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

शाळा सुरू, पण दप्तर मिळेना! महापालिकेच्या विद्यार्थ्यांची ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा

मुंबईतील सखल भागांतील पाणी उपशासाठी ५४७ पंप!

केंद्र सरकारचा मोठा दणका; ‘या’ १६ औषधांच्या वितरणावर तात्काळ बंदी!

पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; हजारो प्रवाशांचे हाल!

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा हिमांशू रॉय लिगसी पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.