Lokrakshanay
Thursday, August 13, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भावेश भिंडेला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी; होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

घाटकोपर येथील होर्डिंग घटनेचा तपास आता क्राईम ब्रँच युनिट ७ कडे सोपवण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 18, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
भावेश भिंडेला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी; होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग घटनेचा तपास आता क्राईम ब्रँच युनिट ७ कडे सोपवण्यात आला आहे. या गुह्यात क्राईम ब्रँचने अटक केलेल्या भावेश भिंडेला  न्यायालयात हजर केले होते. त्याला 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर भिंडेने होर्डिंगसाठी कशा प्रकारे परवानग्या मिळवल्या होत्या याचा तपास युनिट ७ करणार आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या पावसामुळे घाटकोपर येथील होर्डिंग पेट्रोल पंपावर पडून १६ जणांचा मृत्यू झाला होता. होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भावेश भिंडे आणि इतर जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुह्याच्या तपासासाठी ७ पथके तयार केली होती. पोलीस मागावर असल्याचे समजताच भिंडे हा लोणावळा येथे पळून गेला होता. त्यानंतर तो अहमदाबाद येथून उदयपूर येथे गेला. तेथे तो एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. त्याची माहिती समजताच पोलीसांनी उदयपूर येथून भिंडेला अटक केली. आज सकाळी पोलिसांचे पथक भिंडेला घेऊन मुंबईत आले.

या गुह्याचा तपास पंतनगर पोलिसांकडून क्राईम ब्रँच युनिट ७ कडे सोपवण्यात आला. आज भिंडेला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. भिंडेचे किती ठिकाणी होर्डिंग लागले आहेत, जेथे दुर्घटना घडली, त्याचे स्ट्रक्चर ऑडिट कधी झाले होते याचा तपास केला जाणार आहे. तसेच होर्डिंगसाठी कधी, कोणाकडून आणि कशा प्रकारे परवानग्या घेतला होत्या, पंपनीत काही संचालकांची भूमिका काय होती, याचा तपास केला जाईल.

Previous Post

कोणताही ‘अपवाद’ नाही! केजरीवाल यांच्या जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Next Post

मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर; २४ मालमत्तांवर टाच, कर थकबाकीदारांना दणका

Next Post
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत

मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर; २४ मालमत्तांवर टाच, कर थकबाकीदारांना दणका

BreakingNews

ठाण्यात स्वातंत्र्यदिनी रंगणार श्वानांची अनोखी देशभक्ती; ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन!

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

‘महाज्योती’ची यूपीएससीत दमदार कामगिरी; केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थी असिस्टंट कमांडेंट

वर्तकनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर; हातगाड्या, पानटपऱ्या हटवून पदपथ केले चकाचक!

पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पान मसाल्यासाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइल पॅकेजिंग बंद!

‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.