Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

४२ लाखांच्या कपड्यांची सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या कंटेनरमधून चोरी

फेब्रुवारी २०२२ रोजी चीन येथून आयात करण्यात आलेला कपड्याचा कंटेनर सीमाशुल्क विभागातील अधिकार्‍यांनी जप्त केला होता

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 10, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, मुंबई
४२ लाखांच्या कपड्यांची सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या कंटेनरमधून चोरी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सीमाशुल्क चुकवून चीनमधून आलेल्या कंटेनरमधून ४२ लाखांच्या कपड्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा कंटेनर २०२२ मध्ये ताब्यात घेऊन शिवडीतील गोदामात ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चंद्रशेखर रासबिहारी सिंह हे पवईतील सीमाशुल्क विभागात मूल्य निरुपक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते शिवडीतील एमओडी एमबीपीटी येथे आहे. फेब्रुवारी २०२२ रोजी चीन येथून आयात करण्यात आलेला कपड्याचा कंटेनर सीमाशुल्क विभागातील अधिकार्‍यांनी जप्त केला होता. कपडे असलेला हा कंटेनर शिवडीतील सीमाशुल्क विभागाच्या गोदामात ठेवण्यात आला होता. १० फेब्रुवारी २०२२ ते ९ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत अज्ञात चोराने गोदामात शिरून करून चोरी केल्याचा संशय आहे. जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत विविध कंपन्यांचे आठ कंटेनर बाहेरगावाहून आले होते. सीमाशुल्क न भरल्यामुळे हे कंटेनर आणि त्यामधील वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या.

या कंटेनरमधील काही माल चोरीस गेल्याचे नंतर उघडकीस आले होते. पंचनामा करताना ओम साई इंटरप्रायजेस कंपनीने आयात केलेला माल आणि चोरीनंतर झडती घेण्यात आलेल्या मालामध्ये प्रचंड तफावत दिसून आली होती. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने संबंधित कपड्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार उघडकीस येताच सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली होती. गेल्या दीड वर्षांत सुमारे ४२ लाख ४२ हजार १०४ रुपयांच्या कपड्यांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा एक अहवाल नंतर वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर करण्यात आला होता. त्याची गंभीर दखल घेत या अधिकार्‍यांनी चंद्रशेखर सिंह यांना पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांनी शिवडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

पालिकेची मानखुर्दमध्ये फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई

Next Post

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; महाविद्यालय विकास समिती’ची स्थापना न केल्यास कारवाई

Next Post
मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; महाविद्यालय विकास समिती’ची स्थापना न केल्यास कारवाई

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; महाविद्यालय विकास समिती’ची स्थापना न केल्यास कारवाई

BreakingNews

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.