मुंबई : मानखुर्दमध्ये महाराष्ट्र नगर येथे अनधिकृत १५ फेरीवाल्यांविरोधात आज धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत भाजीपाला, फेरीवाल्यांचे बाकडे आणि स्टॅण्ड असे साहित्य जप्त करण्यात आले. पालिका आणि स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांसह आठ कामगारांचा आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. कारवाईनंतर परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला.
याआधीही एम पूर्व विभागाच्या माध्यमातून या परिसरात सातत्याने कार्यवाही करण्यात आली होती. काही नागरिकांनी या परिसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा याठिकाणी कार्यवाही करण्यात आली आहे.