Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

होळीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांवर प्रशासन करणार कठोर कारवाई प्रशासन

रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 22, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
होळीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांवर प्रशासन करणार कठोर कारवाई प्रशासन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर शहरातही बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून, प्रशानाचीही साऱ्यावर करडी नजर पाहायला मिळत आहे. होळीच्या दिवशी होणारी रंगांची उधळण आणि अनेकदा घेणारे अप्रिय प्रसंग, त्यामुळं उत्सवाला लागणारं गालबोट अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी मध्य रेल्वे आणि बेस्ट प्रशासनासह पोलीस यंत्रणाही सज्ज आहेत. होळीसह रंगपंचमीच्या दिवशी लोकल ट्रेनवर रंग किंवा पाण्यानं भरलेले फुगे मारल्यास ते प्रवाशांना लागून त्यामुळं त्यांना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळं अशी कृत्य न करण्याची ताकिद अतिउत्साहींना देण्यात आली आहे. फक्त रेल्वेच नव्हे, तर मुंबईतील बेस्ट बसवरही रंगाचे फुगे मारल्यास हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल.

होळी- रंगपंचमीच्या दिवशी बस आणि लोकल ट्रेनवर फुगे मारण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रंगपंचमीपूर्वी दोन – तीन दिवस आधीपासूनच अशा घटना घडण्यास सुरुवात होते. रेल्वे झोप़डपट्टी किंवा दाटीवाटीनं असणाऱ्या वस्तीतून पुढं जाताना अशा घटना घडतात, ज्यामुळं प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी आता रेल्वे प्रशासन कायद्याचीच मदत घेताना दिसत आहे. रेल्वे प्रशासनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही ताकिद दिली असून, नागरिकांनी या नियमाचं उल्लंघ करू नये असं स्पष्टपणे बजावण्यात आलं आहे. रंगपंचमीच्या दिवशी किंवा होळीनिमित्त बरीच मंडळी सुट्टी नसल्या कारणानं नोकरीवर जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पडतात. पण, अशा वेळी काही अतिउत्साही घटकांमुळं त्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. आता मात्र अशा सर्व मंडळींना कायद्याचाच इंगा दाखवला जाणार आहे. त्यामुळं होळी- रंगपंचमीला अतिउत्साह नकोच!

Previous Post

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग्जविक्री करणाऱ्या १७ नायजेरियन नागरिकांना अटक

Next Post

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय

Next Post
मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.