Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 20, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कक्ष अधिकाऱ्याची क्रेडिट कार्ड शुल्काच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्याने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

३८ वर्षीय तक्रारदार एमएमआरडीएच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून नोकरी करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांना आराध्या शर्मा नावाचा महिलेने दूरध्वनी केला. तिने आपण खासगी बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तिने अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमध्ये सुरक्षा सुविधा सुरू असून त्यासाठी वर्षाला १७०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. तसेच ते बंद करायचे असल्यास तुम्हाला एक ओटीपी पाठवतो. तो तुम्ही सांगा म्हणजे ती सेवा बंद होईल. त्यामुळे तुम्हाला शुल्कही भरावे लागणार नाही, असेही तिने सांगितले. तिच्याशी बोलताना तक्रारदार अधिकाऱ्याला एका पाठोपाठ एक पाच ओटीपी आले. त्यांनी विश्वासाने ते महिलेला सांगितले. त्याचा फायदा घेत अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून जवळपास ४३ हजार रुपये काढण्यात आले. पैसे काढण्यात आल्याची माहिती त्यांनी शर्माला दिल्यावर ते पैसे अर्ध्या तासात पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतील, असे तिने सांगितले. मात्र पैसे जमा न झाल्याने अधिकाऱ्याने महिलेला दूरध्वनी केला. त्यावेळी महिलेचा दूरध्वनी बंद असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बीकेसी पोलिसात धाव घेतली. त्यांनी कथित आयसीआयसी अधिकारी शर्माच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० तसेच महिती तंत्रज्ञानचे सह कलम ६६ (सी),६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरू आहे.

Previous Post

नवी मुंबईत आरोपीला चरस विक्री प्रकरणी अटक

Next Post

बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना

Next Post
बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना

बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.