Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला; महापालिकेची मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना जप्तीची नोटीस

मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 17, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. येत्या सात दिवसांत कर भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी अंतिम नोटीस महापालिका प्रशासनाने जारी केली आहे. तत्पूर्वी या कंत्राटदारांना मार्च महिन्यात नोटीस जारी करून २१ दिवसांच्या आत करभरणा करण्यास सांगितले होते. तरीही कंत्राटदारांनी अद्यापही कर भरलेला नाही. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. यासाठी एमएमआरसीएलकडून मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा, मेसर्स एचसीसी-एमएमएस-१, मेसर्स एचसीसी-एमएमएस-२ या कंत्राटदार कंपन्यांना मेट्रोचे काम करण्यासाठी वडाळा ट्रक तळ, भूखंड क्रमांक ८ टप्पा २ आणि ३ या ठिकाणी कास्टिंग यार्डसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. पाचही कंत्राटदारांकडे मिळून ३२६ कोटी २२ लाख ६९ हजार ८४६ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून वारंवार सूचना देऊनही यापैकी चार कंत्राटदारांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून अद्यापर्यंत करभरणा केलेला नाही. एचसीसी-एमएमसी या कंत्राटदाराकडे आर्थिक वर्ष २०१०-११ पासून मालमत्ता कर थकीत आहे. एमएमआरसीएल आणि संबंधित कंत्राटदारांमधील करारानुसार, या भूखंडाच्या वापरासंबंधीचे कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे.

पालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम २०३ नुसार, १६ मार्च रोजी संबंधित कंत्राटदारांना २१ दिवसांच्या आत करभरणा करण्याची नोटीस जारी केली. ही २१ दिवसांची देय मुदत १५ एप्रिल रोजी संपली तरी करभरणा न केल्याने पालिकेने सात दिवसांची अंतिम नोटीस जारी केली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत करभरणा न केल्यास त्यांच्यावर मालमत्तेची अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

राजकीय पक्षाचे संबंध पाहून कारवाई करू नका! उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग असा होणार सुरक्षित ; उपनगरी रेल्वेमार्गाला सुरक्षेचे ‘कुंपण’

Next Post
मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग असा होणार सुरक्षित ; उपनगरी रेल्वेमार्गाला सुरक्षेचे ‘कुंपण’

मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग असा होणार सुरक्षित ; उपनगरी रेल्वेमार्गाला सुरक्षेचे ‘कुंपण’

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.