कोल्हापूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असली तरी निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यांमध्ये विविध कारवायांमधून तब्बल 19 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये सहा कोटी 64 लाख रुपये रोख रक्कम, 113 किलोचा गांजा, नऊ किलो सोने व 60 किलो चांदीचा समावेश आहे तसेच यामध्ये एक कोटी 87 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. 15 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय, शस्त्रे, अमली पदार्थ, दारू,रोख रक्कम यावर प्रभावी आणि गुणात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे ग्रामीण या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. यामध्ये सहा कोटी 64 लाख रुपयांची रोख रक्कम, दोन कोटी 83 लाख रुपयांची दारू, 22 लाख 24 हजार 665 रुपये किमतीचा 113 किलो गांजा 7.57 कोटीचे नऊ किलो सोने व 60 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे तसेच एक कोटी 87 लाख रुपयांचा गुटखा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. अशा विविध कार्यांमध्ये 19 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झालेला आहे.
दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत 23 अवैध अग्निशस्त्र व जप्त असून सर्व आरोपींवर शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आदर्श निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील दखलपात्र नऊ दखलपात्र, सांगली जिल्ह्यात एक दखलपात्र दोन अदखलपात्र, सोलापूर ग्रामीण भागात एक दखलपात्र व एक अदखलपात्र पुणे ग्रामीण मध्ये पाच दखलपात्र तीन अदखलपात्र एकूण असे दहा गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा वेळेत तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्याबाबत कडक सूचना देण्यात आलेले आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत. त्यामुळे या तीन जिल्ह्यात एकूण 36 सीमा तपासणी नाके सुरू झालेले आहे.त कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ,शिवनाकवाडी ,सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ व सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील कातराळ येथे आंतरराज्य सीमा तपासणी नाके आहेत. या नाक्यावर आरटीओ जीएसटी एक्साईज फॉरेस्ट या विभागाचे प्रतिनिधी तसेच जॉईन इंटिग्रेटेड पोस्ट मॅनेजमेंट पथके तैनात आहेत. या ठिकाणी नार्कोटिक्स डिपार्टमेंटची विशेष स्थान पदके यासाठी कार्यान्वित आहेत. पश्चिम महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने हद्दपार प्रकरणे एम.पी.डी.ए. चे प्रस्ताव तातडीने मार्गी लावणे याकरता जिल्हा दंडाधिकारी यांना सूचित करण्यात आले असून तीन जिल्ह्यातील पोलिसांना वारंवार कोंबिंग कॉम्प्रेशन संवेदशील वाहतूक यासारख्या सूचना दिल्या गेल्याचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले आहे.