Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

मुंबई उच्च न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी १२ लाखांची केली फसवणूक

मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंट बजाविण्यात आल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी वानवडी भागातील एकाची पावणेबारा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 14, 2024
in Uncategorized, ताज्या बातम्या, पुणे
मुंबई उच्च न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी १२ लाखांची केली फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंट बजाविण्यात आल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी वानवडी भागातील एकाची पावणेबारा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. तुम्ही एका खासगी बँकेकडून पावणेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्जाची परतफेड न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंट बजाविण्यात आले आहे, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी मुंबईत पोलीस दलात असल्याचे सांगून अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी धमकी दिली. तक्रारदाराला चोरट्यांनी एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ७९ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी पुन्हा त्यांच्याकडे पैसे मागितले. संशय आल्याने तक्रारादराने शहानिशा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसंकडे तकार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्याची बतावणी सायबर चोरट्यांनी कोथरुड भागातील एका महिलेची नऊ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Previous Post

मुंबईकरांना खुशखबर; मध्य रेल्वे अनंत चतुर्दशीपर्यंत जादा फेऱ्या चालवणार; रात्रभर सुरू राहणार लोकल ट्रेन

Next Post

लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या परोपकारी वृत्तीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक केले

Next Post
लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या परोपकारी वृत्तीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक केले

लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या परोपकारी वृत्तीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक केले

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.