Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या परोपकारी वृत्तीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक केले

मंगल प्रभात लोढा म्हणाले, “दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगलं काम करता. आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 18, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या परोपकारी वृत्तीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक केले
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत गणपती विसर्जनाची धूम आहे. दादर, वर्सोवा, गिरगाव चौपाटी आणि भाऊच्या धक्क्यावर मोठ्या प्रमाणात बाप्पाचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. काही मोठ्या सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी समुद्र किनारा स्वच्छतेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्याज फाऊंडेशनने वर्सोवा येथे सकाळी साडेसहा वाजता समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला. यावेळी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलंय.याबाबत मंगल प्रभात लोढा म्हणाले, “दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगलं काम करता. आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा. अमृता फडणवीसांनी आता माँचं (आईचं) रुप घेतलं आहे. मुलां-मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यासाठी मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही, माँ अमृता असं संबोधणार आहे”, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

अमृता फडणवीसांच्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि अभिनेता आयुष्मान खुराणा उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस रोमँटिक नसल्याचं म्हटलं होतं. “देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहेत, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं.” अमृता फडणवीस यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या.
Previous Post

मुंबई उच्च न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी १२ लाखांची केली फसवणूक

Next Post

भिवंडी मिरवणुकीत दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज

Next Post
भिवंडी मिरवणुकीत दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज

भिवंडी मिरवणुकीत दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज

BreakingNews

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.