Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

१ कोटी ८४ लाख रुपयांचे ड्रग्स कोपरीतून जप्तकरत ११ नायझेरियन व्यक्तींना अटक

गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिसांनी कोपरी परिसरातून १ कोटी ८४ लाख ७० हजाराचे ड्रग्स जप्त केले आहे. कोपरी परिसरात नायझेरियनचे वास्त्यव्य असलेल्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 27, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, नवी मुंबई
५ लाख ५० हजार किमतीचे अमली पदार्थासह नायजेरियन नागरिकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिसांनी कोपरी परिसरातून १ कोटी ८४ लाख ७० हजाराचे ड्रग्स जप्त केले आहे. कोपरी परिसरात नायझेरियनचे वास्त्यव्य असलेल्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली आहे. या कारवाईत ११ नायझेरियन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरी परिसरात चालणारे ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढणारी कारवाई पोलिसांनी केली आहे. कोपरी येथील इमारतीत मोठ्या संख्येने नायझेरियन व्यक्तींचे वास्त्यव होते. त्यांच्याकडून ड्रग्स विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व एपीएमसी पोलिस यांनी संयुक्तरित्या त्याठिकाणी छापा टाकला. वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी विविध पथके तयार केली होती. यामध्ये तिथल्या ११ नायझेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडे एमडी, कोकेन असे तब्बल १ कोटी ८४ लाख ७० हजार रुपये किमतीचे एकूण ड्रग्स मिळून आले. डोनटाऊस चिडोक्वे (४०), ओफोझोर बासिल (३६), एडविन उडैस्के (३२), फॅक्र नझेकवेसी (३१) विनसन उक्वैग्वे (४५), जेम्स कपूर (४१), ओकू लेऑन (३४), जॉर्ज ब्लासन (५०), चार्ल्स वापोका (३७), ए गुसून अलेन (३२) व एनडीवे डोनाटस (३९) अशी त्यांची नावे आहेत.

याप्रकरणी त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गतवर्षी खारघर, उलवे व वाशी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर मोठ्या स्वरूपात कोपरी येथे कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार तुर्भे एमआयडीसी, एपीएमसी, वाशी, कोपर खैरणे, रबाळे, रबाळे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत मिशन ऑल आऊट राबवण्यात आले होते. त्यामध्ये कोपरी परिसरात हि कारवाई करण्यात आली. त्याशिवाय १६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मोटर वाहन कायद्यांतर्गत २५५, अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या १३ जणांवर, कोटपा कायद्यांतर्गत ३७ तर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

महापालिका आयुक्तांचा निर्धार; मुंबईतील मान्सून पूर्व कामं १५ मे आधी पूर्ण करणार

Next Post

२३ माजी संचालक सभापती सह सचिवा विरोधात एपीएमसी चटई क्षेत्र घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

Next Post
२३ माजी संचालक सभापती सह सचिवा विरोधात एपीएमसी चटई क्षेत्र घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

२३ माजी संचालक सभापती सह सचिवा विरोधात एपीएमसी चटई क्षेत्र घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.