Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कुलाबा ते बीकेसी मेट्रो ३ चा प्रवास मे २०२५ पासून प्रवासासाठी खुला होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 19, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कुलाबा ते बीकेसी मेट्रो ३ चा प्रवास मे २०२५ पासून प्रवासासाठी खुला होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई: मुंबईतील पहिल्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसीदरम्यानचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. आता कुलाबा ते बीकेसीपर्यंतचा दुसरा टप्पा मे २०२५ पर्यंत खुला होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं.

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मुंबईतील ही पहिलीच भुयारी मेट्रो. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. एकीकडे प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसतानाच दुसरीकडे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच होती. त्यातच आता दुसरा टप्पाही मे महिन्यांपर्यंत सुरू होणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, “महाराष्ट्रात मेट्रोची कामं वेगाने सुरू केली. आता मुंबई मेट्रो ३ चं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. आपण पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीकरता खुला केलाय. बीकेसी ते कुलाबापर्यंतचा दुसरा टप्पा आहे. या टप्प्यामुळे मुंबईला खऱ्याअर्थाने लाईफलाईन मिळणार आहे. यामुळे १७ लाख प्रवासी प्रवास करणार आहे. आतापर्यंत ६ लाख लोक प्रवासी प्रवास करत आहेत. कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही. आपण मे २०२५ पर्यंत मेट्रो ३ खुला करणार आहोत.”
पहिल्या टप्प्याकडे प्रवाशांची पाठ

एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे बांधकाम केले जात आहे. या ३३.५ किमीमधील १२.५ किमी लांबीचा आरे ते बीकेसी असा टप्पा ७ ऑक्टोबरपासून वाहतूक सेवा सुरू झाली आहे. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो मार्गिका असल्याने आणि उपनगरीय रेल्वे सेवा पोहोचत नाही अशा भागांना ही मेट्रो जोडत असल्याने या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात आरे ते बीकेसी टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

Previous Post

पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना मिळणार पैसे परत – नागपूर विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय

Next Post

आश्वासने पूर्ण होणार;योजना बंद होणार नाहीत …महाराष्ट्र आता थांबणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
आश्वासने पूर्ण होणार;योजना बंद होणार नाहीत …महाराष्ट्र आता थांबणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आश्वासने पूर्ण होणार;योजना बंद होणार नाहीत ...महाराष्ट्र आता थांबणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.