Lokrakshanay
Sunday, September 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एसटी प्रवासातील सवलतींसाठी आता ‘NCMC कार्ड’ बंधनकारक; १ ऑक्टोबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
एसटी प्रवासातील सवलतींसाठी आता ‘NCMC कार्ड’ बंधनकारक; १ ऑक्टोबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. सवलतीच्या तिकिटांसाठी आता एनसीएमसी कार्डचा वापर बंधनकारक असणार असून, त्यानुसार एसटी महामंडळाने राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना प्रवासात सवलत दिली जाते. या सवलतीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्यासाठी एनसीएमसी प्रणाली लागू करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट फक्त एनसीएमसी कार्डद्वारेच दिले जाणार असल्याने पात्र प्रवाशांनी त्यापूर्वी कार्डची नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे सक्रिय एनसीएमसी कार्ड आहे किंवा नोंदणी केल्यानंतर मिळालेली क्यूआर कोडयुक्त पावती आहे, त्यांनाच सवलतीचा लाभ मिळेल. नोंदणी झाल्यानंतर मिळणारी ही पावती ३० दिवसांसाठी वैध राहणार असून, या कालावधीत कार्ड सक्रिय करून त्यामध्ये आवश्यक टॉप-अप करणे बंधनकारक असेल. प्रवासावेळी वाहकाच्या ईटीएम मशीनवर क्यूआर कोड स्कॅन करून सवलतीचे तिकीट मिळू शकेल. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडची राज्यभरातील एसटी आगार, बसस्थानके तसेच अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर सहज नोंदणी करता येणार आहे. कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी भीम (BHIM) ॲपद्वारे टॉप-अप करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला क्यूआर कोड स्कॅन करून काही मिनिटांत रक्कम भरता येईल. तसेच आधार कार्डवरील बायोमेट्रिक पडताळणीदरम्यान बोटांचे ठसे न उमटल्यामुळे अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रवाशांना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्ड नोंदणी करता येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता वाढण्यास, लाभार्थ्यांची अचूक पडताळणी होण्यास आणि तिकीट वितरण अधिक जलद व सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून प्रवासातील अडचणी टाळाव्यात, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

अजय देवगणच्या जुहू बंगल्यावर BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस!

BreakingNews

एसटी प्रवासातील सवलतींसाठी आता ‘NCMC कार्ड’ बंधनकारक; १ ऑक्टोबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी

अजय देवगणच्या जुहू बंगल्यावर BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस!

‘ईव्हीएमऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’; राज ठाकरे यांची सर्व विरोधी पक्षांना आंदोलनाची हाक

२ ऑक्टोबरला राज्यात ‘NO UPI DAY’; यूपीआय शुल्काविरोधात व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी एल्गार

२ ऑक्टोबरला ‘जंतरमंतर २.०’? मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपके कडाडले!

Instamartचा इलेक्ट्रिक डिलिव्हरीला वेग; Yulu आणि Yuma Energy सोबत भागीदारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.