Lokrakshanay
Tuesday, September 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

IIT मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण : न्यायासाठी पालकांचे आझाद मैदानात उपोषण, निष्पक्ष चौकशीची मागणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 29, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
IIT मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण : न्यायासाठी पालकांचे आझाद मैदानात उपोषण, निष्पक्ष चौकशीची मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांचे आई-वडील रवींद्र वाकोडे आणि सोनाली वाकोडे यांनी सोमवारपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. साहिलच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत, प्राध्यापक डुल्ला आणि प्राध्यापक केदारे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आंदोलनस्थळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. माध्यमांशी बोलताना रवींद्र वाकोडे यांनी, “आमची एकच मागणी आहे, ती म्हणजे संबंधितांना अटक व्हावी. जोपर्यंत दोन्ही प्राध्यापकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरू राहील,” असे स्पष्ट केले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज हा तपासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगत, ते सार्वजनिकपणे लीक होऊ नये, अशी भूमिका मांडली. यापूर्वीही साहिलच्या कुटुंबीयांनी मुंबईत आंदोलन केले होते. तसेच त्यांनी अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन तपासाला गती देण्याची मागणी करणारे निवेदनही दिले होते. साहिलच्या कुटुंबीयांनी संस्थेत त्याच्यावर जातीय भेदभाव आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप केला असून, या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असून, निष्पक्ष तपासातून सत्य समोर यावे, अशी कुटुंबीयांची अपेक्षा आहे.

दरम्यान, साहिल वाकोडे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयआयटी मुंबईने स्थापन केलेल्या दहा सदस्यीय समितीने अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मागितली असून, संस्थेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने ती मंजूर केली आहे. समिती साहिलच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांचा आणि संस्थेतील परिस्थितीचा सर्वंकष तपास करत आहे. या प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचे नाव तक्रारीत आल्यानंतर त्यांना रजेवर पाठवण्यात आले असून, त्यांच्याकडील प्रशासकीय जबाबदाऱ्याही तात्पुरत्या काढून घेण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्यावरील आरोपांची सत्यता अद्याप तपासातून सिद्ध झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेनंतर आयआयटी मुंबईतील राखीव प्रवर्गातील प्राध्यापकांच्या प्रतिनिधित्वाचाही मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, संस्थेत एकूण ३६३ प्राध्यापक असून त्यापैकी २९ अनुसूचित जाती, ८ अनुसूचित जमाती आणि ३५ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये दर्शन सोलंकी प्रकरणानंतरही सामाजिक प्रतिनिधित्व आणि भरती प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने आयआयटींना एससी-एसटी प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवण्याचे आवाहन केले होते. आता साहिल वाकोडे प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारी, संस्थेतील सामाजिक वातावरण, चौकशी यंत्रणेची कार्यपद्धती आणि आरक्षणातील प्रतिनिधित्व हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. पोलिसांचा तपास, समितीचा अंतिम अहवाल आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची पडताळणी यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून, न्याय मिळावा या अपेक्षेने कुटुंबीयांचे आंदोलन सुरूच आहे.

Previous Post

निवृत्त डॉक्टरांना मारहाण प्रकरणी ‘बिग बॉस’फेम दिव्या शिंदेवर गुन्हा!

BreakingNews

IIT मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण : न्यायासाठी पालकांचे आझाद मैदानात उपोषण, निष्पक्ष चौकशीची मागणी

निवृत्त डॉक्टरांना मारहाण प्रकरणी ‘बिग बॉस’फेम दिव्या शिंदेवर गुन्हा!

पालघर जिल्ह्यात ३ नवी अपर तहसीलदार कार्यालये मंजुर; मनोरच्या उपेक्षेमुळे असंतोष!

२ ऑक्टोबरला देशात व्यापाऱ्यांचा ‘नो UPI डे’; QR कोड काळ्या कपड्याने झाकणार!

देशव्यापी बँक संप मागे, कामकाज सुरळीत; पण कर्मचाऱ्यांच्या ‘त्या’ मागण्यांचं काय झालं?

एसटी प्रवासातील सवलतींसाठी आता ‘NCMC कार्ड’ बंधनकारक; १ ऑक्टोबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.