Lokrakshanay
Friday, June 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अरिजीत सिंहचा आवाज पुन्हा घुमणार! आमिर खानच्या ‘एक दिन’मध्ये दिसली पहिल्या गाण्याची झलक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 23, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
अरिजीत सिंहचा आवाज पुन्हा घुमणार! आमिर खानच्या ‘एक दिन’मध्ये दिसली पहिल्या गाण्याची झलक
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बॉलीवूड गायक अरिजित सिंगने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की तो कोणतेही नवीन पार्श्वगायन प्रकल्प हाती घेणार नाही. परंतु, त्याला संगीताची खूप आवड आहे, म्हणून तो ते पूर्णपणे सोडून देणार नाही असेहि त्याने यामध्ये म्हटले. अरिजित सिंगच्या या बातमीने सर्वांनाच अस्वस्थ केले आहे. गायकाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सुपरस्टार आमिर खानने त्याच्या घरी भेट दिली. आमिर खानने अरिजितच्या घरी भेट दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. लोकांना असे वाटू लागले की तो गायकाला निवृत्ती मागे घेण्यास उद्युक्त करण्यासाठी तिथे पोहचला आहे. आमिरने मुर्शिदाबाद येथील त्याच्या घरी अरिजितसोबत बराच वेळ घालवला असल्याने, या अटकळांना उधाण आले. आता, या भेटीमागील खरे सत्य समोर आले आहे. आमिर प्रत्यक्षात त्याचा मुलगा जुनैदच्या नवीन चित्रपट “एक दिन” च्या शीर्षकगीतावर चर्चा करण्यासाठी अरिजितकडे गेला होता.

या बैठकीचा एक व्हिडिओ २३ फेब्रुवारी रोजी युट्यूबवर समोर आला आहे, ज्यामध्ये अरिजीतने गायलेले शीर्षकगीत ऐकू येत आहे. व्हिडिओची सुरुवात आमिरने गायकाला त्याच्या निवृत्तीचे कारण विचारण्यापासून होते. तो त्याला विचारतो की तो आतापासून बॉलीवूड गाणी गाणे थांबवणार आहे का? यावर अरिजीत काहीच उत्तर देत नाही. परंतु, आमिर त्याला सांगतो की जर गायकाने गाणे थांबवले तर त्या सर्वांचे मोठे नुकसान होईल. सर्वजण हसतात. ही सगळी गंमत चाहत्यांना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली आहे. व्हिडिओमध्ये, आमिर खान, त्याची टीम आणि चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शकासह, अरिजीतच्या घरी पोहचते, जिथे ते त्याच्या कुटुंबाला भेटतात. ते त्याच्या घरच्या स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड करताना दिसत आहेत. यादरम्यान, आमिर घरी बनवलेले जेवण देखील खातो आणि गायकासोबत बुद्धिबळ खेळता देखील दिसला आहे. आमिर आणि अरिजीत मुर्शिदाबादच्या रस्त्यांवर फिरतानाही दिसत आहे. चाहत्यांना अरिजीत सिंगचे हे गाणे त्याच्या इतर गाण्यांप्रमाणेच खूप आवडले आहे. पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अरिजीतचे गाणे ऐकणे चाहत्यांसाठी भावनिक क्षण ठरले. त्यांनी गायकाला पार्श्वगायनाकडे परतण्याची विनंती केली. परंतु, अरिजीत आपला निर्णय बदलेल की नाही हे वेळच सांगेल. आमिर खानच्या निर्मितीतील “एक दिन” या चित्रपटात जुनैद खानसोबत दक्षिणेतील अभिनेत्री साई पल्लवी देखील मुख्य भूमिकेत झळकली आहे. हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Previous Post

कढीपत्त्याला सोन्याचा भाव! फुकट मिळणारा कढीपत्ता आता ६०० रुपये किलो

Next Post

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनो सावधान! सिम कार्ड काढले तर चॅटिंग होणार बंद – सरकारचा निर्णय

Next Post
व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनो सावधान! सिम कार्ड काढले तर चॅटिंग होणार बंद – सरकारचा निर्णय

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनो सावधान! सिम कार्ड काढले तर चॅटिंग होणार बंद – सरकारचा निर्णय

BreakingNews

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.