गवारच्या शेंगांची भाजी नियमित खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात. गवारच्या शेंगा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच गवारच्या शेंगा या बद्धकोष्ठता दूर करून पचनशक्ती वाढवतात. इतकेच नव्हे तर हृदयाशी संबंधित आजारही गवारच्या शेंगा बऱ्या करतात.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही नियमितपणे गवारच्या शेंगा खाव्यात. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही, असेही सांगितले जाते.कच्च्या गवारच्या शेंगांचा भाजी केल्यावर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. जेव्हा ही शेंग शेतात पूर्णपणे पिकते तेव्हा त्याच्या बियांपासून अनेक औषधे तयार केली जातात. ही औषधी जनावरांच्या उपचारात प्रभावी ठरतात. यासोबतच प्राण्यांसाठी गवारच्या बियांपासून एक विशेष खाद्यपदार्थ तयार केला जातो. जनावरांना तो दिल्यास त्यांची दूध देण्याची क्षमता वाढते, असेही सांगितले जाते.