Lokrakshanay
Monday, August 31, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत झोमॅटोचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण; अनेक डिश प्लॅटफॉर्मवरून हटवल्या!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 31, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत झोमॅटोचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण; अनेक डिश प्लॅटफॉर्मवरून हटवल्या!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था  : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पनीरच्या गुणवत्तेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म जोमॅटोने खऱ्या दुधापासून तयार होणाऱ्या पनीरऐवजी वनस्पती तेलापासून बनविलेले कृत्रिम अर्थात एनालॉग पनीर वापरणाऱ्या रेस्टॉरंट्स आणि क्लाउड किचनविरोधात कठोर भूमिका घेत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण जाहीर केले आहे. या निर्णयानुसार एनालॉग पनीर वापरणाऱ्या किंवा ग्राहकांना त्याबाबत स्पष्ट माहिती न देणाऱ्या आस्थापनांना जोमॅटोच्या ॲपवरून कायमचे हटविण्यात येणार आहे. ग्राहकांना आपण कोणते अन्न खात आहोत, याची पारदर्शक माहिती मिळावी आणि त्यांना दर्जेदार व सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जोमॅटोने सर्व भागीदार रेस्टॉरंट्सना तातडीने कृत्रिम पनीरऐवजी दुधापासून तयार केलेले पनीर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोणत्याही कारणामुळे एनालॉग पनीरचा वापर सुरू ठेवायचा असेल, तर संबंधित पदार्थ मेनूमध्ये स्पष्टपणे तसे नमूद करणे किंवा ते पदार्थ ॲपवरील मेनूमधून काढून टाकणे आवश्यक राहणार आहे. तसेच पुरवठादारांकडून मिळणाऱ्या पनीरच्या पॅकेजिंगवरील लेबल आणि घटकांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य मंगला यांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत ग्राहकांचा विश्वास टिकवणे हेच कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. पनीर हे पारंपरिक पद्धतीने दुधापासून तयार केले जाते; मात्र एनालॉग पनीरमध्ये दुधाचा वापर न करता वनस्पती तेल, स्टार्च आणि वनस्पती प्रथिनांचे मिश्रण वापरले जाते. दिसायला, स्पर्शाला आणि चवीला ते खऱ्या पनीरसारखेच असल्यामुळे अनेक ग्राहकांना त्यातील फरक सहज ओळखता येत नाही. कमी खर्चात अधिक नफा मिळविण्यासाठी काही रेस्टॉरंट्स अशा कृत्रिम पनीरचा वापर करून ते खऱ्या पनीरच्या नावाने विकत असल्याची बाब समोर आल्यानंतर जोमॅटोने हा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणामुळे ग्राहकांना ऑर्डर केलेल्या पदार्थांमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे पनीर वापरण्यात आले आहे, याची स्पष्ट माहिती मिळणार असून अन्नातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. अन्न सुरक्षितता आणि ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य देणाऱ्या या निर्णयाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, अनेक ग्राहकांनी तसेच खाद्यतज्ज्ञांनी जोमॅटोच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. या निर्णयामुळे इतर फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आणि रेस्टॉरंट उद्योगावरही दर्जेदार अन्न व पारदर्शक माहिती देण्याचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

ठाण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

BreakingNews

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत झोमॅटोचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण; अनेक डिश प्लॅटफॉर्मवरून हटवल्या!

ठाण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

बाप्पाच्या विसर्जनसाठी ३५५ कृत्रिम तलावांचे लोकेशन ‘गुगल मॅप’वर उपलब्ध!

विघ्नहर्त्याच्या मदतीला धावले मुंब्र्यातील मुस्लिम तरुण; भरपावसात ४ तास दिला २० फुटी मूर्तीला आधार

५ सप्टेंबरला दिल्लीत जंतरमंतरपेक्षाही मोठे आंदोलन होणार : अभिजीत दिपके

ठाण्यात रिंग मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; ३० ऑगस्टला स्वाक्षरी मोहीम!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.