मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही निकष पूर्ण करावे लागतात. दरम्यान, यामध्ये लाडक्या बहिणींना केवायसी करणेदेखील अनिवार्य आहे. जर केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. केवायसी करण्यासाठी शेवटची मुदत संपली आहे. परंतु ज्यांच्या केवायसीत काही चुका झाल्या असतील त्यांना एक संधी देण्यात आली आहे. महिला अजूनदेखील केवायसी करु शकतात. परंतु यासाठी आता फक्त ५ दिवस उरले आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसीत अनेक महिलांना प्रश्न नीट कळला नाही. त्यामुळे त्यांनी चुकीची उत्तरे दिली आहेत. दरम्यान, चुकीची माहिती देणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला आहे. परंतु आता त्यांना दुरुस्ती करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत तुम्ही ३१ मार्च २०२६ पर्यंत केवायसी करु शकतात. केवायसी करण्यासाठी शेवटचे ५ दिवस उरले आहेत. त्याआधी महिलांना हे काम करायचे आहे. अन्यथा त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. महिलांना यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही. सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ /e या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर तुम्हाला समोर ईकेवायसीची संधी त्या लाभार्थ्यांना आहे त्यांनी ईकेवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले. त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि फोन नंबरची माहिती द्यायची आहे. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची योग्य उत्तरे द्या. यावेळी प्रश्न नीट वाचून मग त्याची उत्तरे द्या. जर तुम्ही चुकीची उत्तरे दिली तर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही. यानंतर तुमचा लाभ कायमचा बंद केला जाईल.

