मुंबई : राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळेत शिक्षक येणार नसल्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील शाळा बंद राहतील.
पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचा निर्णय झाला आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.या मागण्या पूर्ण होत नसल्याचे संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये.१५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावे. शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी. या मागण्यांसाठी मुख्याध्यापक राजव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

