Lokrakshanay
Friday, June 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, ४.५ हजार नागरिकांना मिळाले घरपोच दाखले!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, ४.५ हजार नागरिकांना मिळाले घरपोच दाखले!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मृत्यू दाखला, जन्म दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, ग्रामपंचायतीचा येणे बाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना क्रमांक ८ चा दाखला असे विविध दाखले ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना घर बसल्या मिळाले आहेत. आतापर्यंत साडेचार हजारहून अधिक नागरिकांनी डोअर स्टेप डिलिव्हरी या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या घरपोच सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात आले आहे.

सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारात सहज, सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने काही महिन्यांपूर्वी ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध सेवा मिळत आहेत. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करुन हा उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना ८० विभागांच्या ४०२ प्रकारच्या शासकीय सेवा घरबसल्या मिळत आहेत. ग्रामपंचायतींच्या कार्यरत केंद्रचालक यांना ही जबाबदारी दिली असून यासाठी आपले सरकार सेवा केंद्र मधील केंद्रचालक यांच्यामार्फत कार्यान्वित आहेत. केंद्रचालक नागरिकांकडून वेळ ठरवून त्यांच्या घरी येतात, आवश्यक कागदपत्र स्कॅन करतात आणि ऑनलाइन सेवा प्रक्रिया पूर्ण करतात. सेवा मंजूर झाल्यावर संबंधित प्रमाणपत्र पुन्हा घरपोच पोहचवले जातात. या प्रणालीवर विविध दाखल्यांसाठी आतापर्यंत ५ हजार ९२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४ हजार ७३६ दाखले घरपोच पोहोचविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.

Previous Post

राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा राहणार बंद?

Next Post

राज्यातील ५वी-८वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारीला!

Next Post
राज्यातील ५वी-८वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारीला!

राज्यातील ५वी-८वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारीला!

BreakingNews

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

मराठा विद्यार्थ्यांची भरलेली फी परत मिळणार? सरकारकडून मोठे संकेत!

‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

डोंबिवलीहून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईला जलद जोडणी!

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

बीकेसीच्या सार्वजनिक वाहतूक दिनाला बेस्ट संपाचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.