वृत्तसंस्था : इराण अमेरिका युद्ध जवळपास महिन्याभरापासून सुरु आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगावर वाईट परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, आता युद्ध थांबण्याचे संकेत देण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्प नष्ट करण्याच्या मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील १० दिवस (६ एप्रिल २०२६ पर्यंत) इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले न करण्याचे निर्णय अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. इराणच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सुरू असून त्या सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात युद्ध थांबू शकतं.

