Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महामुंबईत भाज्यांनी ओलांडली शंभरी, फरसबीचे दर आठपट वाढले

मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 5, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
महामुंबईत भाज्यांनी ओलांडली शंभरी, फरसबीचे दर आठपट वाढले
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. फरसबीचे दर एक आठवड्यात आठ पट वाढले आहेत. होलसेल मार्केटमध्ये १६० ते १८० व किरकोळ मार्केटमध्ये २५० ते २८० रुपये किलो दराने फरसबी विकली जात आहे. वाटाणा, गवार, घेवडा, दोडक्यानेही किरकोळ मार्केटमध्ये शंभरी ओलांडली असून, कोथिंबीरची एक जुडी ६० रुपयांना विकली जात आहे. तीव्र उन्हाळा व पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक कमी होऊ लागली आहे. सोमवारी ५४५ ट्रक, टेम्पोमधून २८१८ टन भाजीपाल्याची आवक झाली. त्यामध्ये ४ लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक आठवड्यापूर्वी बाजार समितीमध्ये फरसबी २० ते २४ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर १६० ते १८० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. घेवडा २० ते २४ रुपयांवरून ४० ते ५० रुपयांवर गेला आहे. वाटाणा ३४ ते ४० वरून ९० ते १०० रुपये किलोवर पोहोचला आहे.

पालेभाज्यांचे दरही वाढू लागले आहेत. शेपू बाजार समितीमध्ये ३० ते ५० रुपये जुडी व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपयांचा विकली जात आहे. कोथिंबिरीच्या जुडीचे दर बाजार समितीमध्ये १५ ते ५० जुडीपर्यंत पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्ये एका जुडीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. पुढील काही दिवस बाजारभाव तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

उपोषणासाठी आता नव्या तारखेची घोषणा; मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित

Next Post

‘या’ कारणावरून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर; खासदार होताच नरेश मस्के ॲक्शन मोडवर

Next Post
‘या’ कारणावरून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर; खासदार होताच नरेश मस्के ॲक्शन मोडवर

'या' कारणावरून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर; खासदार होताच नरेश मस्के ॲक्शन मोडवर

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.