उंच माझा झोका या मालिकेचे दिग्दर्शन विरेन प्रधान यांनी केले होते. या मालिकेत नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, कविता लाड, ऋग्वेदी प्रधान, स्पृहा जोशी, विक्रम गायकवाड, शर्मिष्ठा राऊत हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर हिने निभावली होती. तर रमाबाई रानडे यांच्या मोठेपणाची भूमिका स्पृहा जोशीने साकारली होती. या दोघींनाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.
यातील बालकलाकार तेजश्री आता बरीच मोठी झाली आहे. तिला आता ओळखणंदेखील कठीण झालं आहे. मालिकेचे दिग्दर्शक विरेन प्रधान यांची नुकतीच तेजश्रीसोबत भेट झाली. यानिमित्त त्यांनी तिच्याबरोबरचा एक सेल्फी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.
विरेन प्रधान यांनी तेजश्रीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, उंच माझा झोका. छोटी रमा आता मोठी झाली. दिवस भरभर मोठे होतात. आता विरेन प्रधान यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
त्यांच्या पोस्टवर काही चाहत्यांनी कमेंट करत म्हटले की ही किती वेगळी दिसते!. ही कितीही बदलली तरीही अजून तशीच क्युट आहे.अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.