Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंची टीका, मोदी-शाहांना मुंबईला अदाणी सिटी करण्याचा डाव

धारावीचा पुर्नविकास करण्यासाठी अदाणी समूहाला राज्य सरकारने वाढीव टीडीआर दिल्याचे सांगून शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 20, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
उद्धव ठाकरेंची टीका, मोदी-शाहांना मुंबईला अदाणी सिटी करण्याचा डाव
Share on FacebookShare on Whatsapp

 मुंबई : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाबिघाडी सरकारकडून फसव्या योजनांचा पाऊस पाडायला लागले आहे. त्यांचा आतापर्यंतचा कारभार विसरून आणि फसव्या योजनांना भुलून जनता मतदान करेल, अशी त्यांची वेडी आशा आहे. या योजनांमध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आहेत. याशिवाय लाडका मित्र, लाडका कंत्राटदार किंवा लाडका उद्योगपती ही योजनाही सरकारने आणली आहे. या योजनेविरोधात मागच्या वर्षी मोर्चा काढला होता. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीकरांना हक्काचे घर त्याचठिकाणी ५०० चौरस फूटांचे असले पाहीजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. तिथल्या प्रत्येक घरात कुटीरद्योग चालतो. अनेक छोटे छोटे उद्योग याठिकाणी चालतात. त्या उद्योगांचे काय होणार? हा प्रश्न आहे.

सरकारने याठिकाणी बेसुमार टीडीआर काढून अदाणीला देण्याचा त्यांचा डाव आहे, तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईभर अदाणींकडून टीडीआर विकत घेतला पाहीजे, ही अट आता राज्य सरकारने टाकली आहे. त्याविरोधात आम्ही दंड थोपटले आहेत. मागच्या आठवड्यात काही बातम्या आल्या आहेत. मोदी आणि शाह यांनी मुंबईची गिफ्ट सिटी गुजरातला पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदाणी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. उद्या कदाचित हे मुंबईचे नाव बदलून अदाणी सिटी करतील, पण आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. मराठी माणूस पेटला तर अनेकांच्या डोक्यातील हवा बाहेर काढतो आणि मुंबई वाचवतो, हा इतिहास आहे. मुंबईला लुटण्याचे आणि मुंबईची तिजोरी रिकामी करण्याच जे चाळे सुरू आहेत, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्य सरकारने अदाणींना जेव्हा टेंडर दिले, तेव्हा त्यात नसलेल्या गोष्टी ते आता अदाणीला देऊ करत आहेत. वारेमाप एसएफआय अदाणींना देण्याचे कारस्थान रचले जात असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Previous Post

७५ मिमी पावसाची तीन तासात नोंद, सिद्धेश्वर तलावच्या परिसरात संरक्षक भिंत पडली

Next Post

धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, १६२६ मिमी पावसाची नोंद; मोरबे धरण ५१ टक्के भरले

Next Post
धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, १६२६ मिमी पावसाची नोंद; मोरबे धरण ५१ टक्के भरले

धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, १६२६ मिमी पावसाची नोंद; मोरबे धरण ५१ टक्के भरले

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.