Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

७५ मिमी पावसाची तीन तासात नोंद, सिद्धेश्वर तलावच्या परिसरात संरक्षक भिंत पडली

गेल्या चोवीस तासात शहरात १०४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी पहाटे ५.३० ते ८.३० या तीन तासात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 20, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
७५ मिमी पावसाची तीन तासात नोंद, सिद्धेश्वर तलावच्या परिसरात संरक्षक भिंत पडली
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी पहाटे वाढला. शहरात पहाटे तीन तासात ७५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात स्कुटरचे अर्धे चाक बुडेल इतके पाणी साचले होते. यामुळे येथील वाहतूक संथगतीने सुरू होती. तर, सिद्धेश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्याने रस्ता खचला असून यात कुणीही जखमी झालेले नाही. ठाणे शहरात शहरात शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता. परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता. शनिवारी पहाटे पावसाचा जोर वाढला. गेल्या चोवीस तासात शहरात १०४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी पहाटे ५.३० ते ८.३० या तीन तासात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच काळात शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचले होते.

गजानन महाराज चौक वंदना सिनेमागृह जांभळी नाका पेढ्या मारुती मंदिर परिसर, कोपरी येथील बारा बंगला तसेच इतर सकल भागांमध्ये पाणी साचल्याने हा परिसर काहीसा जलमय झाला होता. येथे स्कूटरचे अर्धे चाक बुडेल इतके पाणी साचले होते.यामुळे या भागात वाहतूक काहीशी संथगतीने सुरू होती. पाचपखाडी भागातील सिद्धेश्वर तलावेतील रस्त्यालगतची संरक्षण भिंत कोसळली असून यामुळे रस्त्याच्या काही भाग खचला आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सकाळी ८.३० वाजेनंतरही शहरात पाऊस सुरूच असला तरी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे सखल भागात साचलेले पाणी काहीसे ओसरताना दिसून येत आहे. पावसादरम्यान शहरातील महामार्गांवर वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

Previous Post

डोंबिवली येथील राधाई बेकायदा इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल, भाजप कार्यकर्त्यांना आणखी त्रास

Next Post

उद्धव ठाकरेंची टीका, मोदी-शाहांना मुंबईला अदाणी सिटी करण्याचा डाव

Next Post
उद्धव ठाकरेंची टीका, मोदी-शाहांना मुंबईला अदाणी सिटी करण्याचा डाव

उद्धव ठाकरेंची टीका, मोदी-शाहांना मुंबईला अदाणी सिटी करण्याचा डाव

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.