Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 3, 2026
in ताज्या बातम्या, नाशिक, महाराष्ट्र
आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत
Share on FacebookShare on Whatsapp

नाशिक : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथील हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल) येथे भेट देऊन तेथील विमान निर्मिती आणि अनुषंगिक बाबींची अतिशय आस्थेवाईकपणे माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील तंत्रज्ञ, अधिकारी यांच्याशीही संवाद साधत आपण खऱ्या अर्थाने देशसेवेचे काम करत आहात, अशा शब्दात कौतुकोद्गार काढले. राज्यपाल देवव्रत यांनी आज दुपारी एचएएल येथे येऊन देशाच्या संरक्षण साहित्य आणि उत्पादन निर्मितीच्या अनुषंगाने सुरू असलेले कामांची माहिती जाणून घेतली.  देशाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण अशा सुखोई ३० एमकेआय, तेजस ध्रुव, प्रचंड यांच्या निर्मितीचा प्रवास तेथील अभियंते आणि तंत्रज्ञ यांच्याकडून जाणून घेतला. विविध कक्षाना यावेळी त्यांनी भेट दिली.

सुरुवातीला आगमन झाल्यानंतर एचएएलचे सीईओ साकेत चतुर्वेदी यांनी स्वागत केले, यावेळी कार्यकारी संचालक डायरेक्टर (एअर क्राफ्ट manufacturing डिव्हिसन) कार्यकारी संचालक (फायनान्स) शिशिरकुमार पात्रा, जनरल मॅनेजर (एअर क्राफ्ट overall division ) वरिंदर कुमार, जनरल मॅनेजर (चीफ ऑफ प्रोजेक्ट) सुब्रत मंडल, जनरल मॅनेजर (ए ओ डी) एस. बी चौधरी, जनरल मॅनेजर (AURDC) एस. डी. बेहरा, सीओपी (AMD) एस के नसीरुल्लाह, जनरल मॅनेजर (मनुष्यबळ) जतिंदर कौर आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नाशिक) कश्मिरा संख्ये, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, तहसीलदार अमोल निकम आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, राज्यपाल देवव्रत यांनी  एचएएल येथील विश्रामगृहावर विविध मान्यवरांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या सहकार्यासाठी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या व्हॉईस बोट या तंत्रज्ञानाची माहितीही राज्यपालांनी जाणून घेतली.

Previous Post

क्रांतिज्योती विद्यालय : प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

Next Post

लोकप्रिय ब्रँड केएफसी आणि पिझ्झा हट एकत्र येणार!

Next Post
लोकप्रिय ब्रँड केएफसी आणि पिझ्झा हट एकत्र येणार!

लोकप्रिय ब्रँड केएफसी आणि पिझ्झा हट एकत्र येणार!

BreakingNews

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.