Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 10, 2024
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रधानमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यासोबत महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, सुरेश खाडे, छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व नेत्यांनी मोदींच्या शपथविधीचे कौतुक केले आणि देशाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

या शपथविधी कार्यक्रमात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव , रक्षा खडसे, आणि मुरलीधर मोहोळ  केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील या शपथविधी सोहळ्यात उपराष्ट्रपती जयदीप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह देशातील विविध राज्यांचे प्रमुख, राजकीय नेते, उद्योगजगताचे मान्यवर आणि अनेक परराष्ट्र प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. श्री मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक सोहळ्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली असून पुढील वर्षांमध्ये देशाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातील. या सोहळ्यात एकूण ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यामध्ये ३० केंद्रीय मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री यांचा समावेश आहे.

Previous Post

राष्ट्रपती पोलीस पदकांनी नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी सन्मानित

Next Post

छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध

Next Post
छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध

छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.