Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

टाटा रुग्णालयात सुरू करण्यात आलेली ‘प्रोटॉन उपचार पद्धती’ रुग्णांसाठी ठरतेय वरदान

टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲक्ट्रॅक येथे गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रोटॉन उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2024
in कोकण, ताज्या बातम्या, नवी मुंबई, महाराष्ट्र
टाटा रुग्णालयात सुरू करण्यात आलेली ‘प्रोटॉन उपचार पद्धती’ रुग्णांसाठी ठरतेय वरदान
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई, भावना जैन : टाटा रुग्णालयात रुग्णांना अधिक चांगले व उत्तम उपचार मिळावेत यासाठी गतवर्षी सुरू करण्यात आलेली प्रोटॉन उपचार पद्धती रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. मागील १३ महिन्यांमध्ये टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲक्ट्रॅक येथे १४७ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यापैकी ६२ टक्के रुग्ण सर्वसामान्य असून, २४ टक्के रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲक्ट्रॅक येथे गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रोटॉन उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत कर्करोग झालेल्या १४७ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये १८ टक्के लहान मुलांचा समावेश आहे. या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम फारच कमी असल्याने हाडांच्या कर्करोगासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. हाडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ३२ टक्के रुग्णांवर प्रोटॉन पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. तसेच २९ टक्के स्तन कर्करोग, १४ टक्के डोके आणि मानेचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रोस्थेट कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, पुरुष ग्रंथी कर्करोग आणि जठरासंदर्भातील कर्करोगांवरही उपचार करण्यात आल्याची माहिती प्रोटॉन उपचार केंद्राचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ लस्कर यांनी दिली. प्रोटॉन उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा रुग्णांना व्हावा आणि कमीत कमी दुष्परिणाम व्हावे यासाठी केंद्रात उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांची तज्ज्ञांद्वारे बारकाईने तपासणी करण्यात येते.

परदेशात प्रोटॉन उपचार पद्धतीसाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च येतो. मात्र टाटा रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांवर पाच लाख रुपये, खासगी रुग्णांवर १५ लाख रुपये आणि परदेशी रुग्णांवर २५ लाखांमध्ये उपचार करण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर या पद्धतीने मोफत उपचार व्हावे यासाठी रुग्णालय प्रशासन सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे डॉ. लस्कर यांनी सांगितले.

कोल्हापूर येथील एका दीड वर्षाच्या मुलीला न्यूरो ब्लास्टोमा कर्करोग झाला होता. टाटा रुग्णालयात उपचार केल्यानंतर ती बरी झाली होती. मात्र १६ वर्षांनंतर तिला पुन्हा कर्करोग झाला. कर्करोगाची गाठी ही डोळ्यांजवळ असल्याने ती काढणे डॉक्टरांसाठी एक आव्हान हाेते. मात्र प्रोटॉन उपचार पद्धतीने कर्करोगाची गाठ सहज नष्ट करणे शक्य झाल्याची माहिती डॉ. लस्कर यांनी दिली.

Previous Post

बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्यामुळे बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे झाली अटक

Next Post

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती आधिकार दिन साजरा !

Next Post
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती आधिकार दिन साजरा !

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती आधिकार दिन साजरा !

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.