Lokrakshanay
Wednesday, June 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत शासनाच्या ताब्यात; दुरुस्तीनंतर होणार शासकीय वापर

१,६०१ कोटी रुपयांत संपादन; दुरुस्ती, नूतनीकरण आणि शासकीय कार्यालयांच्या स्थलांतराला लवकरच सुरुवात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 3, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत शासनाच्या ताब्यात; दुरुस्तीनंतर होणार शासकीय वापर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबर २०२३ मध्ये या इमारतीच्या खरेदीला मंजुरी दिल्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाने Air India Assets Holding Limited कडून १,६०१ कोटी रुपये मोजून ही इमारत संपादित केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी अदा केल्यानंतर इमारतीचा ताबा अधिकृतपणे शासनाकडे आला. या संपादनामुळे राज्य शासनाच्या विविध विभागांना प्रशस्त आणि आधुनिक कार्यालयीन जागा उपलब्ध होणार असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हस्तांतरणानंतर मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. शासकीय कार्यालये स्थलांतरित करण्यापूर्वी इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी करून आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच अंतर्गत सजावट, विद्युत यंत्रणा, तांत्रिक सुविधा आणि इतर कामांमध्ये उच्च दर्जा राखण्याचे निर्देश देण्यात आले. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे सुशोभीकरण करण्यासाठी नामांकित वास्तुविशारद आणि तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यभरातून मंत्रालयीन कामांसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांची सोय, सुरक्षितता आणि सुलभता लक्षात घेऊन सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Previous Post

‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेतून ८५० हून अधिक बालकांना नवे जीवन; सुनील गावस्कर भावूक

Next Post

‘दृश्यम ३’मध्ये पुन्हा उलगडणार रहस्यांचा खेळ; अजय देवगणच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

Next Post
‘दृश्यम ३’मध्ये पुन्हा उलगडणार रहस्यांचा खेळ; अजय देवगणच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

‘दृश्यम ३’मध्ये पुन्हा उलगडणार रहस्यांचा खेळ; अजय देवगणच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

BreakingNews

ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; ११ लाखांचे आंबे जप्त, ३७ जणांना अटक

गोव्यातील मंगेशीत उभारले जाणार लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे भव्य स्मारक

रेल्वे अपघात रोखण्यासाठी भिवंडीत देशातील पहिला जलरोधक सबवे!

‘दृश्यम ३’मध्ये पुन्हा उलगडणार रहस्यांचा खेळ; अजय देवगणच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

नरिमन पॉईंटची ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत शासनाच्या ताब्यात; दुरुस्तीनंतर होणार शासकीय वापर

‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेतून ८५० हून अधिक बालकांना नवे जीवन; सुनील गावस्कर भावूक

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.