Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महिला अत्याचाराच्या तपासात झालेल्या चुकांवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली

महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांचा पोलीस गांभीर्याने तपास करणारच नसतील, त्यात त्रुटी ठेवणार असतील आणि त्याचा परिपाक आरोपीची सुटका होण्यात होणार असेल, तर पीडितांनी कोणाकडे दाद मागायची, असा संतप्त प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 12, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
महिला अत्याचाराच्या तपासात झालेल्या चुकांवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांचा पोलीस गांभीर्याने तपास करणारच नसतील, त्यात त्रुटी ठेवणार असतील आणि त्याचा परिपाक आरोपीची सुटका होण्यात होणार असेल, तर पीडितांनी कोणाकडे दाद मागायची, असा संतप्त प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. पोलीस दलासह राज्य सरकारही याबाबत गंभीर नसल्याचे आतापर्यंत दिसून आल्याची उद्विग्नताही न्यायालयाने यावेळी व्यक्त केली.

महिलांवरील अत्याचाराशी संबंधित पाच प्रकरणांतील तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या तपास करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकाच दिवशी सुनावणीसाठी आलेल्या पाच स्वतंत्र प्रकरणांचा दाखला देऊन न्यायालयाने यासंदर्भातील स्पष्टीकरणासाठी राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनाच न्यायालयात पाचारण केले. तसेच, पोलिसांकडून तपासात ठेवल्या जाणाऱ्या गंभीर त्रुटींचा पाढा वाचला. त्यानंतर, तपासात त्रुटी राहणार नाहीत आणि परिणामी आरोपी सुटणार नाही यासाठी एक प्रक्रिया विकसित करण्याबाबच पोलीस दलाचे प्रमुख आणि गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला दिले.

Previous Post

पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज; विसर्जन सोहळ्यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल

Next Post

पुणे स्थानकावरून वंदे भारतचे उद्घाटन रखडले

Next Post
पुणे स्थानकावरून वंदे भारतचे उद्घाटन रखडले

पुणे स्थानकावरून वंदे भारतचे उद्घाटन रखडले

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.