Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दोन ऑगस्टपर्यंत लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी मुदत; पिंपरीतील ८८ मालमत्तांचा लिलाव

वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांच्या ८८ मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 6, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
दोन ऑगस्टपर्यंत लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी मुदत; पिंपरीतील ८८ मालमत्तांचा लिलाव
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी : वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांच्या ८८ मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा ५ ऑगस्ट रोजी लिलाव होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना २ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, सराफी व्यापाऱ्यांच्या बिगरनिवासीसह निवासी मालमत्तांचा समावेश आहे. महापालिकेला बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे करसंकलन विभाग हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मागील पाच वर्षांपासून कोणतीही करवाढ न करता थकीत करवसुलीवर भर दिला. विनानोंद मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांना करकक्षेत आणले. परिणामी, उत्पन्नात भर पडली. आता जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेचा कर वर्षानुवर्षे थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना गेल्या वर्षी नोटीस बजावली होती. तरीही प्रतिसाद न दिल्याने ८८ मालमत्ता जप्त केल्या गेल्या. त्यांचा लिलाव केला जाणार आहे. ५० हजारांपासून तीन लाख रुपयांपर्यंत कर थकबाकी असलेल्या या मालमत्ता आहेत. त्यांचे बाजारमूल्य किमान १९ लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’ मधील प्रकरण आठ (कराधान) नियम ४२ ते ४७ मधील तरतुदींनुसार मालमत्तांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी महापालिकेचा करसंकलन विभाग, मुख्य कार्यालयात २ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रतींसह लेखी अर्जाद्वारे नोंदणी करावी. लिलावातील मालमत्तांबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि इतर यांचे आर्थिक हितसंबंध, हरकती असल्यास योग्य त्या कागदपत्रांसह ३ ऑगस्टपूर्वी लेखी स्वरूपात नोंदवाव्यात. ५ ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत करआकारणी आणि करसंकलन विभागाच्या कार्यालयात ही लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Next Post

इंटेरियर डिझायनरला लाखोंचा फटका; स्वस्तात काश्मीरमध्ये सहलीच्या नावाने गंडा

Next Post
सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!

इंटेरियर डिझायनरला लाखोंचा फटका; स्वस्तात काश्मीरमध्ये सहलीच्या नावाने गंडा

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.