Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करुन घ्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 5, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करुन घ्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात मंत्रालयात मंत्री कु.तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पवार उपस्थित होते. तर दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रात या योजनेचे परिपूर्ण, माहितीचे फलक लावावेत, जेणेकरुन सर्व महिलांना योजनेसंदर्भातील पात्र-अपात्रतेचे निकष समजतील, अशा पद्धतीने नियोजन करुन घ्यावे. तसेच ऑफलाईन फार्म भरुन घेताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेवू नयेत, याबाबतच्या सूचना विभागाकडून देण्यात याव्यात. तालुका गावपातळीवर प्रत्येक अंगणवाडी सेविकांचा व्हॉटस्अप ग्रुप तयार करुन त्या ग्रुपवर या योजनेची सविस्तर माहिती द्यावी. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे ५० रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा पैसे मागण्याचा प्रकार होणार नाही याची दक्षताही घेण्यात घ्यावी, असेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले. गावस्तरावर तसेच तालुकास्तरावर संबंधित घटकांचे सहकार्य घेवून ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन करुन त्या म्हणाल्या की, सकाळी चार तास अंगणवाडी सुरु असते. त्यानंतर एका तासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देण्यात यावे. सर्वांनी एकमेकांच्या समन्वयाने ही योजना यशस्विपणे राबवण्याची सूचना ही यावेळी त्यांनी दिल्या.

Previous Post

वातावरण फाउंडेशनच्या अहवालातून उघड; वायू प्रदूषण निवारणासाठी तरुणांचा पुढाकार

Next Post

दोन ऑगस्टपर्यंत लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी मुदत; पिंपरीतील ८८ मालमत्तांचा लिलाव

Next Post
दोन ऑगस्टपर्यंत लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी मुदत; पिंपरीतील ८८ मालमत्तांचा लिलाव

दोन ऑगस्टपर्यंत लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी मुदत; पिंपरीतील ८८ मालमत्तांचा लिलाव

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.