Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

देशातील सर्वात मोठे रेडिएशन थेरपी केंद्र उभारणार नवी मुंबईत!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 20, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या, नवी मुंबई
देशातील सर्वात मोठे रेडिएशन थेरपी केंद्र उभारणार नवी मुंबईत!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी नवी मुंबईतील टाटा मेमोरियलच्या प्रगत केंद्रात नवीन कॅन्सर केअर इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची घोषणा आयसीआयसीआय बँक आणि टाटा मेमोरियल सेंटरने केली आहे. बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ६२५ कोटी रुपयांच्या योगदानाच्या साहाय्याने हे केंद्र भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी केंद्रांपैकी एक असणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. ‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे भूमीपूजन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष प्रदीप कुमार सिन्हा, कार्यकारी संचालक संदीप बत्रा, कार्यकारी संचालक अजय गुप्ता आणि टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता हे यावेळी उपस्थित होते.

तळमजला तसेच दोन बेसमेंट असलेली ११ मजली इमारत ३.४ लाख चौरस फुटांवर बांधली जाणार आहे. यामध्ये १२ अत्याधुनिक लिनियर एक्सीलरेटर्स आणि कर्करोगाशी संबंधित इतर प्रगत उपकरणे असणार आहेत. ‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ दरवर्षी ७ हजार २०० रुग्णांना रेडिएशन थेरपीची सोय उपलब्ध करून देणार आहेत. या अंतर्गत रुग्णांची दोन लाखांहून अधिक रेडिएशन सत्रांची सोय केली जाणार आहे. या व्यतिरिक्त, वर्षभरात २५ हजार नवीन रुग्णांना ओपीडी सल्ला तसेच निदान करण्यास मदत करेल. हे केंद्र २०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याची चिन्हे आहेत. आयसीआयसीआय बँकेची सीएसआर शाखा, आयसीआयसीआय फाऊंडेशन फॉर इन्क्लुजिव्ह ग्रोथ, या केंद्राचे बांधकाम आणि एकूणच कामकाजावर देखरेख ठेवणार आहे. या भूमीपूजन सोहळ्या प्रसंगी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष प्रदीप कुमार सिन्हा म्हणाले, “आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ या आपल्या सीएसआर शाखेद्वारे आयसीआयसीआय बँक आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका आणि सामुदायिक विकास प्रकल्प या चार संकल्पनांवर काम करत आहे. देशातील महत्त्वाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या आमच्या प्रयत्न आहे. कर्करोग काळजी मोहिमेत टीएमसीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर आणि संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ रेडिएशन थेरपीसाठी भारतातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक असणार आहे.”

Previous Post

कर्जतमध्ये शरद पवार गटाची “काळी दिवाळी”

Next Post

९ नोव्हेंबरला बंजारा समाजाचा मोठा मोर्चा धडकणार शिवाजी पार्कवर!

Next Post
९ नोव्हेंबरला बंजारा समाजाचा मोठा मोर्चा धडकणार शिवाजी पार्कवर!

९ नोव्हेंबरला बंजारा समाजाचा मोठा मोर्चा धडकणार शिवाजी पार्कवर!

BreakingNews

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

मराठा विद्यार्थ्यांची भरलेली फी परत मिळणार? सरकारकडून मोठे संकेत!

‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

डोंबिवलीहून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईला जलद जोडणी!

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.