ठाणे : ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे. येत्या सोमवारी (२२ सप्टेंबर रोजी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ट्रायर रन होणार असल्याचे म्हटले जात आहे. ट्रायर रननंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार आहे. यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे मेट्रो प्रकल्पातील १०.५ किमीच्या पहिल्या फेजचे ट्रायल रन सोमवारी (२२ सप्टेंबर) होणार आहे. या ट्रायर रनसाठी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील मेट्रो मार्गिका ४-४ अ मधील १० स्थानकांवर ट्रायल रन होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रायर रन करण्यासाठी एमएमआरडीएने तयारी केली होती. मेट्रो लाईन-४ मेट्रो रेल्वे स्टेशनच युद्धपातळीवर काम सुरू आहे. २५ ऑगस्ट रोजी मेट्रो ट्रेनचे काही डबे स्टेशनवर मेट्रो मार्गिका ४-४ अ या मार्गिकेवर ठेवण्यात आले होते. हा उन्नत मार्ग असल्याने क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले होते. आता नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रो ट्रेनचा ट्रायल रन होणार आहे. वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने मेट्रो लवकरच सुरु केली जाणार आहे.
ठाणे मेट्रो मार्गिकेवरील स्थानकं
- कॅडबरी
- माजीवाडा
- कपूरबावाडी
- मानपाडा
- टिकूजी -नी -वाडी
- डोंगरी पाडा
- विजय गार्डन ,
- कासरवाडावली,
- गोवानिवाडा
- गायमुख