Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

दिल्ली स्फोटानंतर ठाणे पोलीस सतर्क; बाँब शोधक पथके तैनात!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 11, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
दिल्ली स्फोटानंतर ठाणे पोलीस सतर्क; बाँब शोधक पथके तैनात!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : लाल किल्ल्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटानंतर ठाणे पोलीस आणि रेल्वे पोलीस सतर्क झाले आहे. ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसर, वाहन तळ, ठाणे, कल्याण शहरातील मॉल, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातील हॉटेल, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरु केली आहे. स्थानक परिसरात बाँब शोधक पथके तैनात केली असून समाजमाध्यावरही पोलिसांचे लक्ष आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानक परिसरात सोमवारी स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला असून आता महाराष्ट्रातही विशेषत: मुंबई महानगरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात.

मध्य रेल्वेच्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर ही स्थानके अत्यंत महत्त्वाची आहेत. सतर्कतेच्या इशारानंतर रेल्वे पोलिसांनी सर्वच स्थानकात यंत्रणा सतर्क केली. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात पोलिसांच्या श्वानांच्या मदतीने संशयास्पद वस्तू, वाहनांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयास्पद व्यक्तींच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. बहुतांश रेल्वे स्थानकात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. तर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून शहरातील काही महत्त्वाचे रस्त्यावर नाकाबंदी केली होती. रात्रीच्या गस्ती वाढविण्यात आल्या आहेत. माॅल आणि परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते. तेथेही पोलिसांनी तपासणी सुरु केली. हाॅटेलमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती राहण्यास आले आहेत का, याची तपासणी केली जात आहे. समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे दिशाभूल करणारे समाजमाध्यमावरील वक्तव्य, पोस्टवर देखील पोलिसांचे लक्ष आहे. व्यापाऱ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना संशयास्पद वस्तू, व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.

Previous Post

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर!

Next Post

मध्य रेल्वेचा दिलासा: लवकरच १५ डब्बे लोकल धावणार प्रवाशांच्या सेवेत!

Next Post
मध्य रेल्वेचा दिलासा: लवकरच १५ डब्बे लोकल धावणार प्रवाशांच्या सेवेत!

मध्य रेल्वेचा दिलासा: लवकरच १५ डब्बे लोकल धावणार प्रवाशांच्या सेवेत!

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.