Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

भूमिगत जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती शोधण्यासाठी स्मार्ट वॉटर लीक डिटेक्टर खरेदी करणार – ठाणे महापालिका

पाणी गळती नेमकी कुठे होत आहे, हे शोधता येणार असल्याने तेवढ्याच भागात रस्ते खोदाई करावे लागणार असून यामुळे रस्ते खोदाई आणि दुरुस्तीवरील खर्चात बचत करणे शक्य होणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 16, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
भूमिगत जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती शोधण्यासाठी स्मार्ट वॉटर लीक डिटेक्टर खरेदी करणार – ठाणे महापालिका
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती शोधण्यासाठी पाणी गळती शोध यंत्र (स्मार्ट वाॅटर लिक डिटेक्टर) खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अनेकदा भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती शोधण्यासाठी काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागते. परंतु या यंत्रामुळे पाणी गळती नेमकी कुठे होत आहे, हे शोधता येणार असल्याने तेवढ्याच भागात रस्ते खोदाई करावे लागणार असून यामुळे रस्ते खोदाई आणि दुरुस्तीवरील खर्चात बचत करणे शक्य होणार आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

या स्त्रोतांद्वारे शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे विणण्यात आलेले आहे. या वाहिन्या शहरातील रस्ते आणि जमीनीखालून टाकण्यात आलेल्या आहेत. अनेकदा या भुमिगत वाहिन्यांमधून पाणी गळती होते. या वाहिन्या भुमिगत असल्याने त्यांची गळती नेमकी कोणत्या भागात होते, हे अनेकदा समजत नाही. ही गळती शोधण्यासाठी पालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी रस्ते आणि जमिन खोदाई करून भुमिगत वाहिन्यांची गळती शोधण्यात येते. परंतु खोदाईमुळे रस्ते नादुरुस्त होतात आणि त्याच्या दुरुस्तीवर पालिकेला पैसे खर्च करावे लागतात. हे नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने आता भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती शोधण्यासाठी पाणी गळती शोध यंत्र (स्मार्ट वाॅटर लिक डिटेक्टर) खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यासाठी पालिका प्रशासनाने निविदा काढल्या आहेत.

या यंत्रामुळे पाणी गळती नेमकी कुठे होत आहे, हे शोधता येणार असल्याने तेवढ्याच भागात रस्ते खोदाई करावे लागणार असून यामुळे रस्ते खोदाई आणि दुरुस्तीवरील खर्चात बचत करणे शक्य होणार आहे. स्मार्ट वाॅटर लिक डिटेक्टर यंत्राद्वारे ३ मीटर अंतरापर्यंतच्या भुमिगत जलवाहिन्यांची गळती शोधणे शक्य होणार आहे. काही महिन्यांपुर्वी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हे यंत्र कशाप्रकारे हाताळून पाणी गळती शोधता येते, याची पडताळणी केली होती. मुंब्रा येथील आंबेडकरनगर परिसरातील भुमिगत वाहिनीतून होणारी गळती या यंत्राद्वारे शोधून काढण्यात आली होती. यानंतर पालिकेने हे यंत्र खरेदीचा निर्णय घेतला. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते रुंदीकरण आणि नुतनीकरणाची कामे झाली असून यात जलवाहिन्यांचे स्थलातरित करण्याबरोबरच नवीन जलवाहीन्या टाकल्या आहेत. यामुळे या जलवाहिन्या नेमक्या कुठून कशा गेल्या आहेत, ते शोधण्यासाठी जलवाहीनी लोकेशन डिटेक्टर यंत्रही खरेदी केले जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची प्रगती आणि नागरिक कल्याणाला प्राधान्य दिले

Next Post

डोंबिवली पूर्व येथील वाढलेल्या वाहनांच्या संख्येतून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

Next Post
डोंबिवली पूर्व येथील वाढलेल्या वाहनांच्या संख्येतून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

डोंबिवली पूर्व येथील वाढलेल्या वाहनांच्या संख्येतून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.