Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

सनी देओलनं वाढदिवसानिमित्त केली ‘गबरू’ चित्रपटाची घोषणा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 20, 2025
in मनोरंजन
सनी देओलनं वाढदिवसानिमित्त केली ‘गबरू’ चित्रपटाची घोषणा!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अभिनेता सनी देओलनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ‘गदर २’च्या जबरदस्त यशानंतर, त्याच्या कारकिर्दीत लक्षणीय बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. यावर्षी त्याचा ‘जाट’ चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. दरम्यान आज १९ ऑक्टोबर रोजी सनी पाजी त्याचा ६८वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी सनी देओलनं त्याचा आगामी चित्रपट ‘गबरू’ची घोषणा केली आहे. अभिनेत्यानं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केलं आहे.

याशिवाय त्यानं एक्सवर देखील एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलं, ‘शक्ती ही तुम्ही दाखवत नाही, जे तुम्ही करता ती असते! तुमच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे आभार, वाट पाहणाऱ्या तुमच्या सर्वांसाठी येथे काहीतरी आहे, ‘गबरू’ चित्रपटगृहात १३ मार्च २०२६. धैर्य, विवेक आणि करुणेची कहाणी. माझ्या मनापासून…जगापर्यंत! आता सनीच्या या पोस्टनंतर अनेकजण खुश झाले आहेत. दरम्यान या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन सनीला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी सनीनं आपल्या चाहत्यांना एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. दरम्यान अभिनेत्यानं सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टरसह त्याची रिलीज तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट शशांक उदापूरकर हे दिग्दर्शित करत आहे, ज्यांनी यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी’ आणि ‘बदलापूर बॉईज’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.’गबरू’ चित्रपटाचे पोस्टर खूपच धमाकेदार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भावनिक कहाणी पाहायला मिळणार आहे, असं चित्रपटाच्या पोस्टरवरून वाटते.’ गबरू’ हा चित्रपट १३ मार्च २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान येणाऱ्या काळात, सनी देओल ‘गबरू’ व्यतिरिक्त ‘रामायणम’, ‘बॉर्डर २’ आणि ‘जाट २’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Previous Post

९ नोव्हेंबरला बंजारा समाजाचा मोठा मोर्चा धडकणार शिवाजी पार्कवर!

Next Post

“मी स्वत:ला भाग्यवान समजतो…”, घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया

Next Post
“मी स्वत:ला भाग्यवान समजतो…”, घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया

"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.