Lokrakshanay
Thursday, July 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

शिर्डी साईबाबा संस्थानच्या ब्रेक दर्शन शुल्कात वाढ; आता प्रति भाविक ३०० रुपये!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 9, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
शिर्डी साईबाबा संस्थानच्या ब्रेक दर्शन शुल्कात वाढ; आता प्रति भाविक ३०० रुपये!
Share on FacebookShare on Whatsapp

शिर्डी : शिर्डी साईबाबा संस्थानने व्हीआयपी भाविकांसाठी उपलब्ध असलेल्या ‘ब्रेक दर्शन प्रोटोकॉल’ सुविधेच्या शुल्कात १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, गुरुवारपासून (९ जुलै) प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क आकारले जात आहे. या निर्णयामुळे सशुल्क दर्शन घेणाऱ्या सामान्य भाविकांवरील अन्याय कमी होण्यास मदत होईल, तसेच संस्थानच्या उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी सकाळी ९ ते १०, दुपारी २.३० ते ३.३० आणि रात्री ८ ते ८.३० या वेळेत जनसंपर्क कार्यालयामार्फत २०० रुपयांत ब्रेक दर्शनाची सुविधा उपलब्ध होती. त्याचवेळी सर्वसामान्य भाविकही दर्शन लाईन कॉम्प्लेक्समधील गेट क्रमांक ६ आणि ७ मधून २०० रुपये भरून सशुल्क झटपट दर्शन घेत होते. मात्र, या रांगा पुढे जाऊन मुख्य दर्शन रांगेत मिसळत असल्याने अनेक भाविकांना विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागत होता, तर समान शुल्क भरूनही प्रोटोकॉलधारकांना थेट व्हीआयपी सुविधा मिळत होती. ही तफावत दूर करण्यासाठी ब्रेक दर्शनाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

संस्थानाच्या माहितीनुसार, सशुल्क दर्शन आणि आरती घेणाऱ्या भाविकांच्या तुलनेत ब्रेक दर्शन घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ सुमारे ५.२५ टक्के असून, मंदिरात येणाऱ्या एकूण भाविकांच्या तुलनेत ते अवघे अर्धा ते पाऊण टक्का आहे. शुल्कवाढीसोबतच ब्रेक दर्शनाच्या प्रतीक्षा कक्षात सामान्य रांगेप्रमाणे चहाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, २०० रुपये भरून सशुल्क दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र आणि अधिक जलद रांगेची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नंदी मूर्तीपर्यंत स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध करून दिल्यास पैसे भरूनही होणारा मनस्ताप कमी होईल आणि अधिक भाविक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले आहे. संस्थानच्या आकडेवारीनुसार, २२ जून २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत १ लाख ५८ हजार ५९६ भाविकांनी ब्रेक दर्शन सुविधेचा लाभ घेतला असून, त्यातून संस्थानला ३ कोटी १७ लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याच कालावधीत सुमारे ३० लाख भाविकांनी सशुल्क दर्शन आणि आरती योजनेचा लाभ घेतला.

 

Previous Post

दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

BreakingNews

शिर्डी साईबाबा संस्थानच्या ब्रेक दर्शन शुल्कात वाढ; आता प्रति भाविक ३०० रुपये!

दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरण: आंदोलन पेटले, रमेश म्हात्रेंचे नगरसेवकपद धोक्यात!

दुर्गम भागासाठी एसटीच्या २०० मिनी बस; २०३५ पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचा सरनाईकांचा निर्णय!

‘तारक मेहता…’ मालिका बंद होणार? सेटवरील बांधकामावर निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा!

वसई-विरारमध्ये पाचव्या दिवशीही ट्रॅक्टरच ठरले जीवनवाहिनी; जलमय रस्त्यांमुळे वाहतूक विस्कळीत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.