Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

बदलापुरात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार; पालक आणि नागरिकांचे शाळेबाहेर आंदोलन

सकाळी साडे सहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 20, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
बदलापुरात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार; पालक आणि नागरिकांचे शाळेबाहेर आंदोलन
Share on FacebookShare on Whatsapp

बदलापूर : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी साडे सहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. आरोपीला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आली. बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलिस आणि शाळा प्रशासनावर टिकीची झोड उठवली जात असतानाच सोमवारी शाळेने माफीनामा जाहीर केला आहे.

याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबीत करण्यात आले. मंगळवारी पालक आणि सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी पालक आणि बदलापुरकर शाळेच्या बाहेर जमू लागले होते. सकाळी आठ वाजेपर्यंत हजारो नागरिक शाळेच्या बाहेरील रस्त्यावर जमले होते. घटनेचे गांभीर्य न ओळखता दुर्लक्ष करणारे पोलिस, शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध आंदोलक घोषणा देत होते. आंदोलनात शहरातील महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग दिसून आला. विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेची जुनी इमारत ते थेट माजी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयापर्यंत आंदोलक पसरले होते. पोलीस प्रशासन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दहा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.

Previous Post

जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरच अंबरनाथजवळ स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू

Next Post

बदलापुरात मुलींचं लैंगिक शोषण, लोकांनी 10 तास रेल्वे मार्ग रोखून धरला, नागरिकांचे रौद्ररूप

Next Post
बदलापुरात मुलींचं लैंगिक शोषण, लोकांनी 10 तास रेल्वे मार्ग रोखून धरला, नागरिकांचे रौद्ररूप

बदलापुरात मुलींचं लैंगिक शोषण, लोकांनी 10 तास रेल्वे मार्ग रोखून धरला, नागरिकांचे रौद्ररूप

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.