Lokrakshanay
Tuesday, February 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ऑनलाइन गेमच्या मदतीने शाळकरी मुलाची फसवणूक; दोघे गजाआड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 25, 2025
in गुन्हेगारी, पुणे
ऑनलाइन गेमच्या मदतीने शाळकरी मुलाची फसवणूक; दोघे गजाआड
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या शाळकरी मुलाला ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मयूर ऊर्फ शशिकांत मुंजाजी भिसाड (वय २१, रा. परभणी), तसेच किशाेर डहाळे (वय २२, रा. परभणी) यांना अटक करण्यात आली. याबाबत शाळकरी मुलाच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा भागातील एक शाळकरी मुलगा ऑनलाइन गेमच्या आहारी गेला होता. आरोपी भिसाड याच्याशी मुलाची समाजमाध्यमातून ओळख झाली होती. भिसाड याने ऑनलाईन गेमच्या ‘गेमिंग आयडी’ देतो, असे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर मुलाला घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त केले. मुलाने घरातून घेतलेले दागिने आरोपी भिसाड याला नेऊन दिले. त्यानंतर भिसाडने हे दागिने परभणीतील साथीदार डहाळे याला दिले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तांत्रिक तपासात शाळकरी मुलगा आणि आरोपी भिसाड हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. दोघांमध्ये समाजमाध्यमातून संवादही झाला होता. भिसाडने मुलाला ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून घरातून दागिने आणण्यास सांगितले. याबाबतची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन भिसाडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ६२ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, विनायक मोहिते, प्रताप कांबळे यांनी ही कारवाई केली.

Previous Post

“अबकी बार, मोदी सरकार.” घोषणा करणारे प्रसिद्ध जाहिरात गुरू पियुष पांडे यांचं निधन

Next Post

द्वेषाने कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई

Next Post
द्वेषाने कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई

द्वेषाने कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई

BreakingNews

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.