Lokrakshanay
Friday, October 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुदतबाह्य अन्नपदार्थांची बाजारात फेरविक्री; भिवंडीत FDAकडून लाखो रुपयांचा साठा जप्त!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 30, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मुदतबाह्य अन्नपदार्थांची बाजारात फेरविक्री; भिवंडीत FDAकडून लाखो रुपयांचा साठा जप्त!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : किराणा दुकानातून अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहक नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांवर विश्वास ठेवतात. मात्र, याच विश्वासाला तडा देणारा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईतून समोर आला आहे. कालबाह्य, खराब आणि विक्रीस अयोग्य ठरलेले अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, मागील चार महिन्यांत एफडीएने विविध कारवायांमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त केला आहे. नियमानुसार अशा अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकृत संस्थेची नियुक्ती करणे आणि संबंधित माल प्रत्यक्षात नष्ट केल्याचे पुरावे जतन करणे बंधनकारक असते. मात्र, एका नामांकित कंपनीने कागदोपत्री विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेची नियुक्ती केल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्षात अशी संस्था अस्तित्वात नसल्याचे तपासात उघड झाले. काही प्रकरणांमध्ये विल्हेवाटीची जबाबदारी देण्यात आलेल्या संस्थांमध्ये काही राजकीय संघटनांशी संबंधित पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय एफडीएने व्यक्त केला असून, याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. भिवंडी शहरात अनेक मोठ्या कंपन्यांची वितरण केंद्रे आणि गोदामे आहेत. या ठिकाणांहून कालबाह्य अथवा विक्रीस अयोग्य माल विल्हेवाटीसाठी पाठविला जातो. मात्र, हा माल प्रत्यक्षात नष्ट न होता अनधिकृत गोदामे, दलाल आणि किरकोळ विक्रेत्यांमार्फत पुन्हा बाजारात पोहोचत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. भिवंडी आणि मुंब्रा परिसरातील काही गोदामांमध्ये अन्नपदार्थांच्या पाकिटांवरील मुदतीत फेरफार करणे, पुनर्पॅकिंग करणे किंवा माल साठवून ठेवण्याचे प्रकार घडत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जून महिन्यात भिवंडीतील आठ आस्थापनांवर कारवाई करताना आवश्यक कागदपत्रे आणि खरेदीची देयके सादर न केल्यामुळे कालबाह्य साठा जप्त करण्यात आला. तसेच सरावली येथील ॲमेझॉन रिटेल इंडियाच्या पूर्तता केंद्रात सुमारे दीड टन खराब व कालबाह्य अन्नपदार्थ आढळल्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणात संबंधित साठ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या संस्थेकडे आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचे तसेच माल प्रत्यक्ष नष्ट केल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. जून महिन्यातच भिवंडीत अडविण्यात आलेल्या एका आंतरराज्यीय ट्रकमध्ये सुमारे ५ लाख १८ हजार रुपयांचे पीठ आणि ब्रँडेड पॅकेटमधील अन्नसाठा कोणतीही वैध कागदपत्रे नसताना जप्त करण्यात आला. हा माल गुजरातमध्ये पुनर्विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी ठाणे व पुणे जिल्ह्यांमध्ये सात पथकांनी एकाच वेळी धडक कारवाई केली. रिलायन्स रिटेल, रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, झोमॅटो हायपरप्युअर, ब्लिंकिटसह विविध आस्थापनांतील साठ्याची तपासणी करण्यात आली. नऊ ठिकाणी तपासण्यात आलेल्या साठ्याचे मूल्य सुमारे ४८ लाख रुपये होते. तसेच २१ ऑक्टोबर रोजी भिवंडीतील पागाव येथील ब्लिंक कॉमर्सच्या गोदामात ३२ लाख ७१ हजार रुपयांचा कालबाह्य अन्नसाठा आढळून आला. साठा अधिकृत संस्थेकडे सोपवल्यानंतर त्याची वाहतूक आणि अंतिम विल्हेवाट याबाबतची अखंड व पडताळता येणारी कागदपत्रांची साखळी उपलब्ध नसल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. या कारवाईदरम्यान पाच परवानाधारक आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर परवाना नसलेल्या चार आस्थापनांचा व्यवसाय बंद करून साठा जप्त करण्यात आला. याशिवाय तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये कंपनीचे अधिकारी, व्यवस्थापक, पुरवठादारांसह १७ जणांचा समावेश आहे. कालबाह्य वस्तूंची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली काही संस्थांद्वारे मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, त्यामागे राजकीय संबंध असण्याची शक्यताही एफडीए तपासत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

मुंबईत छठपूजेसाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन; परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ लागू!

BreakingNews

मुदतबाह्य अन्नपदार्थांची बाजारात फेरविक्री; भिवंडीत FDAकडून लाखो रुपयांचा साठा जप्त!

मुंबईत छठपूजेसाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन; परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ लागू!

आशा स्वयंसेविकांना दिवाळी भेट; प्रत्येकी ५ हजार रुपयांचा बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

वरुण बेव्हरेजेसचा वर्ध्यात मेगा प्रोजेक्ट; २,१०० कोटींच्या गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

ठाण्यातील राजकारणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे यांचा पक्षपदाचा राजीनामा

भविष्यातील तंत्रज्ञानात भारताने जगाचं नेतृत्व करावं; पंतप्रधान मोदींचं आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.