Lokrakshanay
Friday, July 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणेकरांना दिलासा! डिझेल विक्रीवरील बंदी उठवली – जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 4, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणेकरांना दिलासा! डिझेल विक्रीवरील बंदी उठवली – जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : समाज माध्यमांवर डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या बातम्यांनंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लावलेले निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील इंधन पुरवठा आणि वितरणाची परिस्थिती पूर्वपदावर आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने २७ मार्च २०२६ च्या मूळ आदेशात अंशतः बदल करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत.

या सुधारित आदेशानुसार, डिझेल पंप मालकांनी आता डिझेलचे वितरण पूर्वीप्रमाणेच करावे. मात्र, कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीकडून गरजेपेक्षा जास्त डिझेलची उचल होणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वाहनांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नेल्या जाणाऱ्या डिझेलच्या नोंदी अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचबरोबर डिझेलचा अनधिकृत साठा करणाऱ्यांविरुद्ध ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ नुसार कारवाई केली जाईल. तसेच,या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत,असेही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

विजेत्यांनी महाराष्ट्राची मान उंचावली! इंडिया स्किल्स स्पर्धेत मिळवली १७ पदके; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पदकविजेत्यांचे अभिनंदन

Next Post

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Next Post
राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी 'पिंक रूम'! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

BreakingNews

शिर्डी साईबाबा संस्थानच्या ब्रेक दर्शन शुल्कात वाढ; आता प्रति भाविक ३०० रुपये!

दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरण: आंदोलन पेटले, रमेश म्हात्रेंचे नगरसेवकपद धोक्यात!

दुर्गम भागासाठी एसटीच्या २०० मिनी बस; २०३५ पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचा सरनाईकांचा निर्णय!

‘तारक मेहता…’ मालिका बंद होणार? सेटवरील बांधकामावर निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा!

वसई-विरारमध्ये पाचव्या दिवशीही ट्रॅक्टरच ठरले जीवनवाहिनी; जलमय रस्त्यांमुळे वाहतूक विस्कळीत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.