Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा: डोंबिवली रेल्वे स्थानकातील ३ व ४ फलाटावरील सरकता जिना सुरू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 8, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा: डोंबिवली रेल्वे स्थानकातील ३ व ४ फलाटावरील सरकता जिना सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण दिशेकडील सरकता जिना मंगळवारी कोणत्याही उद्घाटन प्रक्रियेचा घाट न घालता रेल्वे प्रशासनाने सुरू केला. गेल्या दीड वर्षापासून या सरकत्या जिन्याची कामे सुरू होती. त्यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन जिना आणि स्कायवॉकवर जावे लागत होते. सरकता जिना सुरू होताच लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. आता वळसा घेऊन न जाता उतरल्यानंतर जागीच स्कायवाॅकवर जाण्यासाठी प्रवाशांना जिना उपलब्ध होणार आहे. या सरकत्या जिन्याच्या गेल्या दीड वर्ष रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना होणारा त्रास याविषयी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत हे विषय मांडले होते.

डोंबिवली हे मध्य रेल्वेच्या स्थानकावरील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकात प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीन आणि चारवर कल्याण दिशेकडील पादचारी जिन्याच्या ठिकाणी सरकता जिना उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. दीड वर्षापूर्वी प्रवाशांना कल्याण बाजूकडील पादचारी जिना बंद करण्यात आला. हा जिना काढून टाकण्यात आल्यानंतर तीन महिन्यात सरकत्या जिन्याचे काम पूर्ण होईल असे रेल्वेचे नियोजन होते. पण, या कामात अनेक तांत्रिक अडथळे आले. त्यामुळे सरकता जिना उभारणीला तब्बल दीड वर्ष लागले. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरून मुंबईला जाणाऱ्या आणि कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल धावतात. डोंबिवली रेल्वे स्थानकात या दोन्ही फलाटांवर लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांना कल्याण बाजूकडील जिने सरकत्या जिन्याच्या कामासाठी तोडून ठेवण्यात आल्याने वळसा घेऊन मग पादचारी जिन्यावरून जावे लागत होते. सरकत्या जिन्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून गतीने सुरू होते. यांत्रिक, तांत्रिक आवश्यक चाचण्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरकता जिना सुरू करण्यात आला. या जिन्यामुळे वळशाचा त्रास वाचणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

डोंबिवलीत फडके रस्त्यावर वृध्दाला रिक्षाची जोरदार धडक, रिक्षा चालक फरार

Next Post

‘बिग बॉस शो’ तात्काळ बंद करण्याचे आदेश, स्टुडिओ परिसराला सील

Next Post
‘बिग बॉस शो’ तात्काळ बंद करण्याचे आदेश, स्टुडिओ परिसराला सील

‘बिग बॉस शो’ तात्काळ बंद करण्याचे आदेश, स्टुडिओ परिसराला सील

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.