Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

डोंबिवलीत फडके रस्त्यावर वृध्दाला रिक्षाची जोरदार धडक, रिक्षा चालक फरार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 8, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
डोंबिवलीत फडके रस्त्यावर वृध्दाला रिक्षाची जोरदार धडक, रिक्षा चालक फरार
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या एका ७० वर्षाच्या वृध्दाला भरधाव वेगात असलेल्या एका रिक्षा चालकाने जोराची धडक दिली. या धडकेत या वृध्दाला गंभीर दुखापत झाली आहे. या वृध्दाला कोणतीही मदत न करता रिक्षा चालक नेहरू मैदान दिशेने रिक्षेसह पळून गेला. कल्याण, डोंबिवलीत अशा मुजोर, बेशिस्त रिक्षा चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक विभाग यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन अशा मुजोर रिक्षा चालकांवर दंडात्मक आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चंद्रशेखर रघुनाथ पाटणकर (७०) असे रिक्षेच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ते डोंंबिवली पूर्वेतील मानव कल्याण केंद्र परिसरातील एका सोसायटीत राहतात. बुधवारी संध्याकाळी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला चंद्रशेखर पाटणकर फडके रोड भागात दसऱ्यानिमित्त वस्तू खरेदीसाठी आले होते. फडके रस्त्यावरील वृंदावन हॉटेल समोरील रस्त्यावर खरेदी करत असताना अचानक त्या ठिकाणाहून भरधाव वेगात गर्दीतून वाट काढत रिक्षा चालक चालला होता. त्या रिक्षा चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगातील रिक्षेची चंद्रशेखर पाटणकर यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत पाटणकर रस्त्यावर पडले. त्यांच्या हात, पायाला दुखापत झाली. वृध्द रस्त्यावर पडले म्हणून इतर पादचाऱ्यांनी त्यांना उठून एका बाकड्यावर बसविले. त्यांना पाणी पिण्यास दिले. या सगळ्या धावपळीत ठोकर मारणाऱ्या रिक्षा चालकाने तेथे थांबून पाटणकर यांना डॉक्टरकडे उपचारासाठी नेणे आवश्यक होते. तो तेथून इतर नागरिकांना चकवा देत भरधाव वेगात नेहरू मैदान दिशेने रिक्षा घेऊन पळून गेला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर चंद्रशेखर पाटणकर यांचे नातेवाईक आले. त्यांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रामनगर पोलीस ठाण्यात पाटणकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालका विरुध्द गु्नहा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी फडके रस्ता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या रिक्षा चालकाचा शोध घ्यावा आणि संबंधित रिक्षा चालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Previous Post

६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ४.५ तास चौकशी

Next Post

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा: डोंबिवली रेल्वे स्थानकातील ३ व ४ फलाटावरील सरकता जिना सुरू

Next Post
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा: डोंबिवली रेल्वे स्थानकातील ३ व ४ फलाटावरील सरकता जिना सुरू

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा: डोंबिवली रेल्वे स्थानकातील ३ व ४ फलाटावरील सरकता जिना सुरू

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.