Lokrakshanay
Saturday, June 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

एम.डी ड्रग्ज फॅक्टरीवर धाड; उत्तराखंडहून ३ आरोपी अटकेत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 7, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
एम.डी ड्रग्ज फॅक्टरीवर धाड; उत्तराखंडहून ३ आरोपी अटकेत
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे (विशेष प्रातिनिधी) : कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एन.डी.पी.एस. गुन्ह्याच्या तपासादरम्यान ठाणे गुन्हे शाखा घटक ५, वागळे इस्टेट यांना मोठे यश मिळाले असून, उत्तराखंड राज्यातील पिथोरगड जिल्ह्यातील मेलतोडा गावामधील एम.डी. ड्रग्ज फॅक्टरीवर धाड टाकून १८.५४ लाख रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान अटक आरोपी विशाल सिंह व मल्लेश शेवला यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एम.डी. ड्रग्ज उत्तराखंडहून खरेदी केल्याचे उघड झाले. या धाग्याचा मागोवा घेत पोलीस नाईक ठाणेकर यांच्या तांत्रिक तपासामुळे मेलतोडा गावातील ड्रग्ज फॅक्टरीचा ठाव लागला. दि. २७ जून २०२५ रोजी दोन स्वतंत्र पथकांनी ही कारवाई पार पाडली. मात्र, कारवाईच्या वेळी फॅक्टरीतील तिघे आरोपी फरार झाले होते. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे दुसऱ्या पथकाने लखीमपूर-खीरी, उत्तर प्रदेश येथील नेपाळ सीमेवरून सियाज गाडीसह हे तिघे आरोपी अटक केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू (रा. टनकपूर, उत्तराखंड), भिम सुरेंद्र यादव (रा. नालासोपारा, महाराष्ट्र) व अमरकुमार लक्ष्मणराम कोहली (रा. टनकपूर, उत्तराखंड) यांचा समावेश आहे. या आरोपींपैकी ओम गुप्ता आणि अमरकुमार हे यापूर्वीही गुन्हा रजिस्टर नं. १८६/२०२४, कासारवडवली पोलीस ठाण्यातील एम.डी. ड्रग्ज प्रकरणात पाहिजे आरोपी होते. एम.डी. ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री व रसायने व आरोपींच्या ताब्यातील चारचाकी सियाज कार, एकूण मुद्देमालाची किंमत: ३०.९९ लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, व सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास अधिकारी स.पो.नि. भुषण शिंदे पुढील तपास करत आहेत. या यशस्वी कारवाईमुळे राज्यातील अमली पदार्थ साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात असून, ठाणे पोलिसांच्या तांत्रिक आणि रणनीतिक क्षमतेचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

Previous Post

NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल,“मुंबईवर २६/११ हल्ला झाला मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”

Next Post

मुखमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करणार

Next Post
मुखमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करणार

मुखमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करणार

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.