Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विकासकामांचे लोकार्पण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 5, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्त्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा; त्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनिल तटकरे, आमदार सुनील कांबळे, रवींद्र धंगेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य रुग्णांवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले की, रुग्ण सेवेसाठी चांगले डॉक्टर उपलब्ध व्हावे यासाठी डॉक्टरांचे मानधन वाढविणे गरजेचे आहे. कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जोखीम स्वीकारून रुग्णसेवा केल्यामुळे त्यांचे तसेच वैद्यकीय सुविधांचे महत्त्व समजून आले. या काळात ससून रुग्णालयाच्या उभारणी सुरु असलेल्या नव्या इमारतीचा उपयोगही कोरोना बाधितांवर उपचारासाठी करण्यात आल्याने इतर पायाभूत सुविधा करता आल्या नव्हत्या. ससून रुग्णालयाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता रुग्णालय इमारतीच्या विस्तारासाठी आवश्यक जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ससून रुग्णालयात काळानुसार आवश्यक बदल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयातील उत्तम सुविधांचा अभ्यास करून एका महिन्यात आवश्यक बाबींसाठी प्रस्ताव सादर करावा. सामान्य रुग्णांसाठी ससून रुग्णालय महत्त्वाचा आधार असल्याने येथे अत्याधुनिक सुविधांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

रुग्णालयाच्या नव्या गरजा लक्षात घेता ११ मजल्याची सर्व सुविधांनी युक्त नवी इमारत उभारण्यात आली आहे. विशेषोपचारासाठी सर्वसामान्य गरीब माणसाला अत्याधुनिक सुविधांच्या आधारे आरोग्य उत्तम सुविधा मिळावी असा शासनाचा प्रयत्न आहे. गोरगरीब रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी या सुविधांचा उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना क्रीडांगणासाठी अतिरिक्त सुविधा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, प्लेग, स्वाईन फ्ल्यू, कोविड सारख्या संकटाच्या काळात ससून रुग्णालयाने उत्तमरीतीने रुग्णसेवा केली. रुग्णालयाच्या नव्या इमारतीवर १८३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. अद्ययावत उपचार सुविधा असलेली नवी इमारत रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही येथे दर्जेदार सुविधांची निर्मिती होत आहे. इंटरव्हेंशन रेडीओलॉजी विभागासाठी टाटा ट्रस्टतर्फे २ कोटी, महिलांच्या स्वतंत्र क्ष-किरण तपासणी केंद्रासाठी फजलानी ट्रस्टतर्फे २ कोटी ५० लाख आणि मध्यवर्ती चिकित्सालयीन प्रयोगशाळेसाठी पंजाब नॅशनल बँक व पहल फाऊंडेशनमार्फत ५ कोटी ३५ लाख रुपये सीएसआरमधून देण्यात आले आहेत. यापुढील काळात रुग्णालयात किडनी आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात येतील, असेही श्री.मुश्रीफ म्हणाले. रुग्णालयात १४० मृतदेह शव शीतगृहात जतन करण्याची आणि ३० वर्षाचे अभिलेख जतन करण्याची सुविधा शवचिकित्सा केंद्राच्या नव्या इमारतीत आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

Previous Post

राज्यात पुण्यात सर्वाधिक ९१ रुग्ण; जेएन.१ चा धोका वाढला!

Next Post

महालक्ष्मी रेसकोर्स जमीन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा आरोप; सरकारच्या जवळच्या बिल्डकरकडून जमीन हडपण्याचा प्रयत्न

Next Post
महालक्ष्मी रेसकोर्स जमीन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा आरोप; सरकारच्या जवळच्या बिल्डकरकडून जमीन हडपण्याचा प्रयत्न

महालक्ष्मी रेसकोर्स जमीन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा आरोप; सरकारच्या जवळच्या बिल्डकरकडून जमीन हडपण्याचा प्रयत्न

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.