Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

पोलिसांचे बारकाईने धार्मिक स्थळांवर लक्ष

शिळ - डायघर येथील एका धार्मिक स्थळाच्या परिसरात तीन जणांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 20, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
पोलिसांचे बारकाईने धार्मिक स्थळांवर लक्ष
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शिळ -डायघर येथील एका धार्मिक स्थळाच्या परिसरात तीन जणांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर ठाणे पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांचे यापूर्वीच ‘गुड माॅर्गिंग पथक’ तसेच रात्रीच्या वेळेत गस्ती पथके कार्यरत आहेत. ठाणे जिल्हा भूमिपूत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समितीने देखील पोलीस आयुक्तांकडे धार्मिक स्थळांवरील सेवेकऱ्यांच्या पोलीस पडताळणी करण्याची मागणी करून त्यांसदर्भाचे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले आहे. नवी मुंबई येथे राहणाऱ्या विवाहितीचे तिच्या सासरकडील नातेवाईकांसोबत वाद झाले होते. त्यामुळे ती ६ जुलैला शिळगाव येथील एका धार्मिक स्थळात आली होती. तेथील तीन सेवेकऱ्यांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले. महिला शुद्धीत आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. ती पळून जात असताना तिघांनी तिला मारहाण करून तिचे डोके जमीनीवर आपटले.

त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. तिचे प्रेत मंदिराच्या परिसरात एका झुडपामध्ये फेकून दिले. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी श्यामसुंदर शर्मा, संतोषकुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तिघांना अटक केली आहे. असे असले तरी धार्मिक स्थळातील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांची पोलिसांकडून पाहणी केली जात असते. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात गुड माॅर्निंग पथक आणि रात्रीच्या वेळेत गस्ती पथके तैनात असतात. परंतु या प्रकरणानंतर आता धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यास सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. डायघर येथे झालेल्या प्रकारानंतर सर्वच धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही लावणे आणि येथे कार्यरत असलेल्या सेवेकऱ्यांची पोलीस पडताळणी करण्याची मागणी ठाणे जिल्हा भूमिपुत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समितीने केली आहे. त्यांच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Previous Post

भिवंडीत नागरिक हैराण रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे; रस्त्यांवर खड्ड्यांना सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप

Next Post

डोंबिवली येथील राधाई बेकायदा इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल, भाजप कार्यकर्त्यांना आणखी त्रास

Next Post
डोंबिवली येथील राधाई बेकायदा इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल,  भाजप कार्यकर्त्यांना आणखी त्रास

डोंबिवली येथील राधाई बेकायदा इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल, भाजप कार्यकर्त्यांना आणखी त्रास

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.