Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

दिवाळी निमित्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात; आकाश कंदील उडविण्यास बंदी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 18, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
दिवाळी निमित्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात; आकाश कंदील उडविण्यास बंदी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरात दिवाळी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलीस विभागासाठी ५० पोलिसांचा आणि परिमंडळ (ठाणे शहर) एक विभागासाठी १५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे आकाश कंदील देखील हवेत उडविण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दिवाळी निमित्ताने सोमवारी दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित केला जातो. विविध राजकीय पक्षांकडून सामाजिक संस्थेच्या नावाने दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील विविध भागातून तरुण-तरुणी ठाणे, कल्याण, डोंबिवली भागात गर्दी करतात. उत्सवात गैरप्रकार, चोरी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या भागात नौपाडा पोलिसांसोबत मुख्यालयातील सुमारे १५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डोंबिवली आणि कल्याण भागातही तेथील पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. कार्यक्रमांच्या आयोजनामुळे वाहतुक व्यवस्थेवर त्याचा मोठ्याप्रमाणात ताण येत असतो. त्यामुळे मुख्यालयातून वाहतुक पोलीस विभागास ५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असेल. याशिवाय वाहतुक साहाय्यकही ठिकठिकाणी नेमले जाणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध आहे. अनेकजण दिवाळीनिमित्ताने हवेमध्ये आकाश कंदील उडवितात. त्यांनाही प्रतिबंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Previous Post

दिवाळी खरेदीचा वाहतुक व्यवस्थेवर परिणाम; कोर्टनाका, टेंभीनाका परिसरात वाहतुक कोंडी

Next Post

भयानक अपघात: समुद्रात उलटली बोट, ३ भारतीयांचा मृत्यू

Next Post
भयानक अपघात: समुद्रात उलटली बोट, ३ भारतीयांचा मृत्यू

भयानक अपघात: समुद्रात उलटली बोट, ३ भारतीयांचा मृत्यू

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.