मुंबई : बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एका आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या एकूण १७० नोटा जप्त केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हमीद मुजावर (३४) असे अटक आरोपीचे नाव असून तो गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातील रहिवासी आहे. परिसरात वायरमेन म्हणून काम करणाऱ्या हमीदकडे मोठ्या प्रमाणात बनावट नोटा असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी ८५ हजार रुपयांच्या एकूण १८० नोटा जप्त केल्या. या सर्व नोटा ५०० रुपयांच्या असून त्याने या नोटा विक्रीसाठी स्वतःकडे ठेवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.